लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या दरम्यान होणाऱ्या विमान प्रवासाच्या नियमांमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. शारीरिक संपर्क अधिकाधिक टाळता यावा, यासाठी हे बदल आहेत. या नियमांची ज्यांना कल्पना नाही त्यांना विमानतळावर अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे बदलेले नियम काय आहेत, हे आधी समजून घ्या.- प्रवाशांंना मोबाईल अॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून उड्डाण करण्याच्या ४८ तासांपूर्वी किंवा ६० मिनिटांच्या आत आॅनलाईन चेक-इन करणे अनिवार्य आहे. विमानतळावर पूर्वीसारखे चेक इन करण्याची आता नव्या बदलामध्ये परवानगी नाही.- वेब चेक इन सोबतच आपला बोर्डिंग पास जनरेट होईल. वेब चेक इन करण्यासोबतच आपले सामानही घोषित करा, जेणेकरून आपले बॅगेज टॅगसुद्धा जनरेट होईल. बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅगची प्रिंटेड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी आपल्या सोबत बाळगा.- आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल असायला हवे. विमानतळावर प्रवेश करताना हे अॅप ग्रीन स्थितीमध्ये असेल तरच विमान प्रवासाला परवानगी मिळेल.- प्रत्येक वेळी मास्क वापरा आणि सॅनिटायझर सोबत ठेवा.- प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी राज्यवार क्वारंटाईन व ई-पास नियमांची माहिती जाणून घ्या.- आवश्यक प्रकिया पूर्ण करण्यासाठी दोन तासांपूर्वी विमानतळावर पोहचा. विमानतळावरील काऊंटर संबंधित फ्लाईटच्या ६० मिनिटांपूर्वी बंद होतील.- चेक इन बॅगेज हे प्रति यात्री २० किलोग्रॅम वजनापर्यंतच मर्यादित राहील. सीटच्या खाली फिट्ट बसण्याएवढीच लहान हँडबॅग सोबत ठेवता येईल.-खाद्यसामग्री आणि पेय पदार्थ उड्डाणादरम्यान उपलब्ध केले जाणार नाहीत. आपल्या सुविधेनुसार प्रवाशांनी एअरपोर्टवर किंवा घरी भोजन उरकावे. बोर्डिंगच्या पूर्वी पाण्याच्या बॉटल दिल्या जातील. त्याचा वापर विमानात बसण्यापूर्वीच करावा लागेल.
विमान प्रवास करताय, आधी हे समजून घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:19 PM