उमरेड : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले. ते पूर्ववत ठेवण्यात यावे व इतरही मागण्यांसाठी गुरुवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, स्थानिक उमरेड शाखेचा मोर्चा उमरेड तहसील कार्यालयावर धडकला. ओबीसी समाजाच्या न्याय, हक्क व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. आयोजित सभेत अनेकांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक ठाकरे, सुरेश झुरमुरे, विलास मुंडले, विश्वास गोतमारे, राजेश बांदरे, सुरेश चिचमलकर, प्रकाश सावलकर, हरिश्चंद्र झाडे, सूरज इटनकर, उमेश हटवार, महेश भुयारकर, उमेश वाघमारे, जितेंद्र गिरडकर, लेमन बालपांडे, विशाल देशमुख, राजेश भेंडे, दिलीप सोनटक्के, दिनकर तायवाडे, मनीष शिंगणे, गुणवंत मांढरे, केतन रेवतकर, अमित लाडेकर, राकेश नौकरकर, रितेश राऊत, महेश लांजेवार, केशव ब्रम्हे, घनश्याम लव्हे, मनीष शेंडे, सतीश कामडी, दत्तू जिभकाटे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक निशिकांत चौधरी यांनी केले. संचालन मंगेश गिरडकर यांनी तर आभार सतीश चौधरी यांनी मानले.
फोटो : उमरेड येथे ओबीसी महासंघाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा.