भिवापूर : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व इतर ओबीसी बांधवांनी शुक्रवारी एकत्रित येत स्थानिक तहसील कार्यालयापुढे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यभरात वातावरण खदखदत आहे. मोर्चे, आंदोलनही सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व इतर ओबीसीबांधवानी राज्यभरातील तालुकास्थळावर लाक्षणिक उपोषणाचे आयुध हाती घेतले. स्थानिक तहसील कार्यालयापुढेसुद्धा उपोषण करण्यात आले. आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी तैलिक महासभेचे अध्यक्ष सुधाकर पडोळे, ओबीसी नेते भास्कर येंगळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, चेतन पडोळे, मिलिंद राऊत, सुभाष साखरकर, दिनेश पडोळे, रोशन गायधने, किरण साखरकर, स्नेहा वैद्य, विनोद कामडी, रामेश्वर तलमले, ईश्वर वैद्य, सुनील साखरकर, संजय तलमले, विनोद बोकडे आदी उपस्थित होते.
020721\img-20210702-wa0094.jpg
तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदण देतांना सुधाकर पडोळे व भाष्कर येंगळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ