लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील वाढत असलेले तापमान गुरुवारी दुपारच्या सुमारास बरसलेल्या अवचित पाऊसधारांनी थंडावले. सकाळपासूनच उष्णतेचा कडाका जाणवत होता. हवामान खात्याने येत्या काही दिवसात विदर्भात पावसांच्या सरींचा इशाराही दिलेला होता. लोकसभा निवडणुकींच्या धामधुमीचे आणि विदर्भातील कडक उन्हाळ््याचे असे दोन्ही वाढत असलेले तापमान या तुरळक सरींनी माफक प्रमाणात का होईना पण शांत केले. यंदा उन्हाळा जास्त असल्याचेही वृत्त आहेच. अशात उन्हाळ््याला तोंड फुटण्याच्या सुमारास आलेल्या या सरींनी वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण केल्याने नागपूरकर सुखावले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचे वातावरण दुपारच्या सुमारास निर्माण झाले. पावसासोबतच पुसदमध्ये बोराच्या आकाराच्या गारा पडल्या.
विदर्भात पावसाची अवचित हजेरी; वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 3:32 PM
गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील वाढत असलेले तापमान गुरुवारी दुपारच्या सुमारास बरसलेल्या अवचित पाऊसधारांनी थंडावले.
ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यात पडल्या गारा