लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पेचात पडली असून काँग्रेस- राष्ट्रवादीचा वाद आता मुंबई दरबारी पोहचण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ७ जानेवारीला होत आहे. या निवडणुकीच्या तयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक गणेशपेठेतील कार्यालयात गुरुवारी झाली. तीत आ.अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, जिल्हा निरीक्षक संजय दलाल, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. विजय घोडमारे, आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी लवकरच तालुक्यांचा दौरा करून उमेदवाराची चाचपणी केली जाईल, असे सांगत उमेदवारी देताना कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल, असे आश्वस्त केले. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले, जागा वाटपासाठी काँग्रेसशी बोलणी केली जाईल. पण सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.बैठकीला ईश्वर बाळबुधे, राडू राऊत, बंडोपंत उमरकर, अविनाश गोतमारे, चंद्रशेखर चिखले, कमलाकर घाटोळे, संतोष नरवाडे, उज्ज्वला बोढारे, डॉ. योगेश धनुस्कर, डॉ. विलास मूर्ती आदी उपस्थित होते.
राज्यात एकत्र, जिल्ह्यात मात्र काँग्रेस विरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 9:59 PM
काँग्रेससह शिवसेनेला सोबत घेत राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत तर दुसरीकडे मात्र नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत काँग्रेस विरोधातच दंड थोपटले आहेत.
ठळक मुद्देराष्ट्रवादीची दुहेरी चाल : काँग्रेस पडली पेचात