शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

विद्यापीठ कायद्याला महाविद्यालयांकडून हरताळ :विद्यार्थी विकास कक्षच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 8:07 PM

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत अद्यापही तरतुदीनुसार विद्यार्थी विकास कक्षांची स्थापना झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठाकडूनदेखील यासंदर्भात फारसा पुढाकार घेण्यात आलेला नसून अंमलबजावणी झाली की नाही याची चाचपणी करण्याची यंत्रणादेखील अस्तित्वात नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे विद्यापीठाचीदेखील अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत अद्यापही तरतुदीनुसार विद्यार्थी विकास कक्षांची स्थापना झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठाकडूनदेखील यासंदर्भात फारसा पुढाकार घेण्यात आलेला नसून अंमलबजावणी झाली की नाही याची चाचपणी करण्याची यंत्रणादेखील अस्तित्वात नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीत किती महाविद्यालयांत विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्यात आला, किती महाविद्यालयांवर कारवाई झाली किंवा नोटीस बजावण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भात ११ जानेवारी २०१७ रोजी राजपत्र प्रकाशित झाले होते व तत्काळ हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यातील कलम ५६ (२) नुसार विद्यापीठ व प्रत्येक संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या विविध समस्या, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास इत्यादीकडे या कक्षाच्या माध्यमातून लक्ष देणे अपेक्षित आहे. प्रत्येक महाविद्यालयातील कक्षांचे नेतृत्व उपप्राचार्यांकडे राहील. सोबतच प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेले शिक्षक, महिला शिक्षक, समाजसेवक, समुपदेशक यांचा समावेश अशी कायद्यात तरतूद आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठातील एकाही महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष स्थापन झालेला नाही. सर्व ठिकाणी हा कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दोन शैक्षणिक सत्र उलटून गेल्यानंतरदेखील विद्यार्थी विकास कक्ष स्थापन न होऊ शकण्याची कारणे काय याची कुठलीही विचारणा विद्यापीठाने केलेली नाही. एकाही महाविद्यालयावर कारवाईदेखील झालेली नाही. यामुळे विद्यापीठाच्या प्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी