शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

विद्यापीठाने उगारले ‘तक्रारास्त्र’

By admin | Published: September 03, 2015 2:30 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत प्रशासनाने एकदम कडक भूमिका घेतली आहे.

महेंद्र निंबार्ते विरोधात पोलीस तक्रार : बदनामी केल्याचा आरोपनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत प्रशासनाने एकदम कडक भूमिका घेतली आहे. विद्यापीठाच्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबार्ते यांच्याविरोधात विद्यापीठाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. निंबार्ते यांनी ‘सोशल मीडिया’वरून जाणुनबुजून विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप विद्यापीठाने लावला आहे. विद्यापीठाने प्राधिकरणांतील एखाद्या माजी सदस्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर ‘पीएच.डी.’ पदवीधारकांना लगेच पदवी देण्यात आल्या. या पदवीवर ‘युनिव्हर्सिटी’ ऐवजी ‘युनिबर्सिटी’ असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली. त्यामुळे विद्यापीठाने चुकीच्या पदव्या छापल्या की काय असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु संबंधित मुद्दा हा ‘फॉन्ट’मुळे निर्माण झाला असून यात चुकीचे काहीही नाही असे ‘लोकमत’ने सर्वात अगोदर प्रकाशित केले होते. परंतु महेंद्र निंबार्ते यांनी जाणूनबुजून ‘सोशल मीडिया’वर विद्यापीठाची बदनामी केली व चुकीच्या माहितीचा प्रसार केला. यातून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप विद्यापीठाने लावला. विद्यापीठाची बदनामी केल्याबाबत प्रशासनाने त्यांच्याविरोधात बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली.(प्रतिनिधी) पदवी परत घेण्याचा प्रश्नच येत नाहीविद्यापीठाच्या पदवीमध्ये ‘लिन्कन’ हा ‘फॉन्ट’ वापरण्यात आला आहे. हा ‘फॉन्ट’ जगातील अनेक विद्यापीठांत वापरण्यात येतो. या ‘फॉन्ट’नुसार ‘युनिव्हर्सिटी’चे ‘स्पेलिंग’ चुकलेले नाही. त्यामुळे पदवी परत घेण्याचा प्रश्नच नाही. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये असे आवाहन डॉ.येवले यांनी केले.विद्यापीठात आंधळे सरकारविद्यार्थ्यांच्या पदवीमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ऐवजी ‘युनिबर्सिटी’ असे स्पष्ट दिसत आहे. याअगोदरदेखील ‘लिन्कन’ हा ‘फॉन्ट’वापरण्यात येत होता असा दावा विद्यापीठाने केला आहे. मग अगोदरच्या पदव्यांमध्ये असे का झाले नाही? याअगोदर खोटी लिपी वापरत होते का असा प्रश्न महेंद्र निंबार्ते यांनी उपस्थित केला आहे. एखादी बाब विद्यापीठाच्या लक्षात आणून देणे हा गुन्हा नाही. मुळात विद्यापीठातील अनेक गैरप्रकारांना मी समोर आणले. कुलसचिवांकडील दोन पदांचा कारभार, परीक्षा नियंत्रकांचे अपयश या बाबींवर आवाज उचलला. याला दाबण्यासाठी विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. विद्यापीठात एककल्ली कारभाराला सुरुवात झाली असून आंधळे सरकार आले आहे. विद्यापीठातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी डोळे उघडून काम करावे असे सांगतानाच आणखी गैरप्रकार समोर आणू असा दावा निंबार्ते यांनी केला.पहिले तक्रार दाखल कराप्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.हिरेखण हे नवे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याकडे बुधवारी सकाळीच पदभार सोपविणार होते. परंतु या प्रकरणात पहिले पोलीस तक्रार दाखल करा आणि मगच जबाबदारीतून मुक्त व्हा, अशी अटच प्रशासनाकडून त्यांना टाकण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी डॉ.खटी यांच्याकडे पदभार सोपविला.