शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई?

By admin | Published: April 26, 2017 1:43 AM

पॉवरग्रीडचे अधिकारी व पोलिसांनी अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करून मांगसा (ता. सावनेर) येथील

 पॉवरग्रीड आरोपीच्या पिंजऱ्यात : पोलिसांनी नोंदविले तीन एफआयआर नागपूर : पॉवरग्रीडचे अधिकारी व पोलिसांनी अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप करून मांगसा (ता. सावनेर) येथील १० शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.पॉवरग्रीडतर्फे मौदा ते बैतूलपर्यंत ४०० केव्हीची ट्रान्समिशन टॉवर लाईन उभारण्यात येत आहे. कंपनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून केळवद पोलिसांनी शेतकऱ्यांविरुद्ध २१ मार्च रोजी भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३५३, १८६, ३२७, ५०६ अंतर्गत, २२ मार्च रोजी भादंविच्या कलम ४४७, ४२७, १५८, १०९ व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यातील कलम ३ अंतर्गत तर, २६ मार्च रोजी भादंविच्या कलम ४४७, १४३, ४२७, १०९, १८८ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. शेतकरी कामात अडथळा निर्माण करतात. त्यांनी जेसीबी मशीनवर दगडफेक केली. टॉवरसाठी खोदलेले खड्डे मातीने बुजवले, असे पॉवरग्रीड अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण वगळता अन्य सर्व गुन्हे जामीनपात्र व किरकोळ स्वरूपाचे असून त्यात आरोपींना अटक करण्याची गरज नाही. असे असताना पोलिसांनी शेतकऱ्यांना अवैधरीत्या अटक करून मारहाण केली. अटक केलेल्या पाच शेतकऱ्यांना २४ तासांमध्ये न्यायदंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले नाही. कंपनीने भरपाई न देता टॉवरचे काम सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन झाले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, वादग्रस्त एफआयआर रद्द करण्यात यावेत, याचिकाकर्त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी व दोषी पोलिसांवर विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.(प्रतिनिधी) राज्य शासनाला नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस अधीक्षक, केळवदचे पोलीस निरीक्षक व पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया यांना नोटीस बजावून ३ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकाश धुंडे, विठ्ठल रहाटे व इतरांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.