शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

संघ मुख्यालयाजवळ बेवारस कार

By admin | Published: March 26, 2017 1:34 AM

संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली.

जबलपूरच्या तरुणाने उडविली खळबळ : पोलिसांची तारांबळनागपूर : संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच शीघ्र कृती दलाच्या जवानांसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. ताब्यात घेतलेल्या कारच्या तपासणीनंतर कारमालकाचा शोध लागला अन् जबलपूरच्या तरुणाने ती अनवधानाने तेथे पार्क करून ठेवल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री दोन ते तीन तासांपासून एक सिल्व्हर कलरची आय-२० कार उभी होती.मागे आणि पुढे दोन्ही नंबरप्लेट नसल्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांसोबतच गस्तीवरील पोलिसांचेही त्याकडे लक्ष वेधले गेले. मध्यरात्री १२ ची वेळ होऊनही कारचा मालक तेथे आला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा अस्वस्थ झाली. वरिष्ठांना माहिती कळताच त्यांनी संघ मुख्यालयाकडे धाव घेतली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना आणि संघ मुख्यालयाच्या आतील भागातही अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे ही यंत्रणासुद्धा सतर्क झाली. सर्वत्र फोन खणखणू लागले. मोठा पोलीस ताफा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे (बीडीडीएस) श्वान, शीघ्र कृती दल, अग्निशमन दल आणि क्रेनही घटनास्थळी बोलावून घेण्यात आली. कार क्रेनने उचलून बाजूच्या मैदानात नेण्यात आली. बीडीडीएसच्या श्वानाने कारची तपासणी केल्यानंतर आतमध्ये काहीच नसल्याचे त्याने संकेत दिले.(प्रतिनिधी)... मामाच्या घरी सापडले!जबलपूरच्या स्वप्निल जैन यांची ही कार होती. ते शुक्रवारी नागपुरात आले. त्यांचे मामा संजय प्रेमचंद जैन बाजूलाच राहतात. त्यामुळे स्वप्निल मामाच्या घरी आले होते. संपर्क होताच पोलीस जैन यांच्याकडे पोहोचले. त्यानंतर स्वप्निलसह पोलीस कारजवळ पोहोचले. नुकतीच कार घेतल्यामुळे त्यावर नंबर प्लेट लावायची राहून गेल्याचा खुलासा त्यांनी केला. पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. कुठलाही संशयास्पद धागादोरा सापडला नाही. अनवधानाने ही कार या संवेदनशील ठिकाणी ठेवण्यात आली, असे स्पष्ट झाले. वरिष्ठांकडे तसे कळविण्यात आले अन् सुरक्षा यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी जुजबी कलमानुसार स्वप्निलवर गुन्हा दाखल केला.