शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

संघ मुख्यालयाजवळ बेवारस कार

By admin | Published: March 25, 2017 4:52 PM

संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. 25 -  संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली. बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच शिघ्र कृती दलाच्या जवानांसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. ताब्यात घेतलेल्या कारच्या तपासणीनंतर कारमालकाचा शोध लागला अन् जबलपूरच्या तरुणाने ती अनवधानाने तेथे पार्क करून ठेवल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. 
 
दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेल्या संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री दोन ते तीन तासांपासून एक सिल्वर कलरची आय -२० कार उभी होती. मागे आणि पुढे दोन्ही नंबरप्लेट नसल्यामुळे जाणा-या - येणा-यांसोबतच गस्तीवरील पोलिसांचेही त्याकडे लक्ष वेधले गेले. मध्यरात्री १२ ची वेळ हऊनही कारचा मालक तेथे आला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा अस्वस्थ झाली. वरिष्ठांना माहिती कळताच त्यांनी संघ मुख्यालयाकडे धाव घेतली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना आणि संघ मुख्यालयाच्या आतल्या भागातही अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.
 
त्यामुळे ही यंत्रणासुद्धा सतर्क झाली. सर्वत्र फोन खणखणू लागले. मोठा पोलीस ताफा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे (बीडीडीएस) श्वान, शिघ्र कृती दल, अग्निशमन दल आणि क्रेनही घटनास्थळी बोलवून घेण्यात आली. कार क्रेनने उचलून बाजुच्या मैदानात नेण्यात आली. बीडीडीएसच्या श्वानाने कारची तपासणी केल्यानंतर आतमध्ये काहीच नसल्याचे त्याने संकेत दिले. त्यामुळे पोलिसांनी कारची एका बाजुच्या खिडकीची काच उचकटून दार उघडले. त्यानंतर आतमधील कागदपत्रांवरून कारमालकासोबत संपर्क साधण्यात आला. 
 
... मामाच्या घरी सापडले ! 
जबलपूरच्या स्वप्नील जैन यांची ही कार होती. ते शुक्रवारी नागपुरात आले. त्यांचे मामा संजय प्रेमचंद जैन बाजुलाच राहतात. त्यामुळे स्वप्नील मामांच्या घरी आले होते. संपर्क होताच पोलीस जैन यांच्याकडे पोहचले. त्यानंतर स्वप्नीलसह पोलीस कारजवळ पोहचले. नुकतीच कार घेतल्यामुळे त्यावर नंबर प्लेट लावायची राहून गेल्याचा खुलासा त्यांनी केला. पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. कुठलाही संशयास्पद धागादोरा सापडला नाही. अनवधानाने ही कार या संवेदनशिल ठिकाणी ठेवण्यात आली, असे स्पष्ट झाले. वरिष्ठांकडे तसे कळविण्यात आले अन् सुरक्षा यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी जुजबी कलमानुसार स्वप्नीलवर गुन्हा दाखल केला.