लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित राकेश (काल्पनिक नाव) नागपुरात राहतो. त्याला आईवडिल आणि एक लहान भाऊ आहे. दहावीत असूनही अभ्यास करत नसल्यामुळे आई त्याच्यावर रागावली. त्यावर रागाच्या भरात राकेश १३ जून रोजी सकाळी ट्युशनला जाण्याच्या बहाण्याने घरून निघाला. परंतु ट्युशनला न जाता तो शहरात इकडे-तिकडे फिरत होता. शेवटी तो नागपूर रेल्वे स्थानकावर आला. त्याला घरी जायचे होते. मात्र, घराकडे जाणारी शहर बस कुठे थांबते याविषयी त्याने जसपालला विचारणा केली. मी तुला बसस्टॉपपर्यंत सोडतो, असे सांगुन जसपालने त्याला आपल्या दुचाकीवर बसविले. दिवसभर फिरविल्यावर आपण गोंदियाला फिरायला जाऊ असे आमिष दाखविले. सायंकाळी राकेशला घेऊन तो इतवारी रेल्वे स्थानकावर गेला. तेथे दुचाकी ठेवून रात्री ८.३० वाजता राकेशला घेऊन गोंदियाला पोहोचला. तेथे त्याला लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याने अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे राकेश ओरडला. त्यावर लॉजचे कर्मचारी धावून गेले. परंतु जसपालने काहीच झाले नसल्याचे सांगून लॉजच्या कर्मचाऱ्यांना परत पाठविले. जसपालच्या मोबाईलवरून राकेशने मित्रांना कॉल केला होता. इकडे राकेश दिसत नसल्याने त्याचे आईवडिल मिसिंगची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तक्रार देत असतानाच राकेशच्या आईला फोन आला. त्याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. आईने पत्ता विचारताच पोलीस नातेवाईकांना घेऊन गोंदियाला रवाना झाले. तेथे आरोपीला अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तपास लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक खुशाल शेंडगे करीत आहेत.
नागपुरात विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 1:09 AM
एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देआरोपीला अटक : फिरायला नेण्याच्या बहाण्याने गोंदियाला नेले