शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अनावश्यक याचिका शासनाला खडसावले

By admin | Published: August 05, 2014 1:02 AM

किरकोळ विषय असतानाही कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात येत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, बुधवारी राज्य शासनाला कडक

हायकोर्ट : मुख्य सचिवांना बोलावण्याचे निर्देशनागपूर : किरकोळ विषय असतानाही कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात येत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, बुधवारी राज्य शासनाला कडक शब्दांत खडसावले. यासंदर्भात स्पष्टीकरण व शासनाच्या धोरणाची माहिती देण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांना बोलावण्याचे निर्देश न्यायालयाने सहायक सरकारी वकिलाला दिले आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या एका निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेतील किरकोळ विषय पाहून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी शासनाचे कान उपटले, तसेच अनावश्यक याचिकांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली. राज्य शासन छोटे-छोटे विषय असतानाही कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे, असे नमूद करून यासंदर्भात शासनाचे काय धोरण आहे, याची माहिती मुख्य सचिवांनी व्यक्तिश: उपस्थित राहून द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.अमरावती येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी राजेंद्र टापर यांनी २००२ मध्ये ५३ हजार ३१३ रुपयांचे वैद्यकीय उपचाराचे बिल सादर केले होते. २७ आॅगस्ट २००७ रोजी बिल मंजूर करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष रक्कम देण्यास विलंब झाल्यामुळे टापर यांनी रकमेवर व्याज देण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी नागपुरातील महाराष्ट्र प्रशासकीय लवादात अर्ज केला होता. लवादाने २ आॅगस्ट २०१३ रोजी अर्ज मंजूर करून शासनाला व्याज देण्याचे निर्देश दिले. याविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शासनातर्फे एपीपी भारती मालधुरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)