लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शहरातील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ लगत ट्रक व इतर जड वाहने मनमानी पद्धतीने उभी केली जातात. त्याचा इतर वाहतूकदारांना त्रास हाेत असल्याने वाडी शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने शुक्रवारी (दि. २३) दुपारी ११ ट्रकमालकांवर दंडात्मक कारवाई केली.
ट्रक व इतर जड वाहने टीसीआय पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोड आणि खडगाव रोडवर उभे करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कारण, या मार्गावर कंपन्या व गाेदामांची संख्या अधिक आहे. राेडच्या दाेन्ही बाजूंना ट्रक उभे केले जात असल्याने उर्वरित राेडवर वाहतूक काेडी हाेत असून, त्यातून अपघातही हाेतात. याचा त्रास वाढल्याने नागरिकांनी वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्याकडे तक्रार केली हाेती.
त्या तक्रारीची दखल घेत राजेंद्र पाठक यांनी भरारी पथकाची नियुक्ती करून शुक्रवारी या मार्गांची पाहणी केली. यात त्यांना राेडवरील वाहनांची गर्दी, उभ्या ट्रकमुळे वाहनचालकांना नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने जावे लागणे, त्यातून हाेणारी वाहतूक काेंडी व त्रास यासह अन्य बाबी आढळून आल्या. त्यामुळे या पथकाने तातडीने तेथील ११ ट्रकमालकांवर दंड ठाेठावला. शिवाय, या ठिकाणी जड वाहने उभी करून नयेत, अशा सूचनाही दिल्या. ही कारवाई पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या नेतृत्वात सहायक पाेलीस निरीक्षक गोपिका कोडापे, सहायक फाैजदार बघेल, हवालदार रवींद्र गजभिये, रामकिशोर व प्रेमचंद पाटील यांच्या पथकाने केली.
230721\img_20210723_162931.jpg
फोटो