शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पूर्व विदर्भात अवकाळीच्या अतिवृष्टीने झाेडपले; काेरडेठाक राहणारे नदी-नाले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 9:15 PM

Nagpur News विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत.

नागपूर : विदर्भात मागील आठवडाभरापासून सुरू असलेला पावसाचा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे भर उन्हाळ्यात काेरडेठाक राहणारे नदी-नाले दुथडी वाहत आहेत. अमरावतीच्या वरूडनंतर आता भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीलाही पूर आला असून मंगळवारी नदीचे पाणी दुथड्या ओव्हरफ्लाे हाेवून वाहत हाेते. मंगळवारी नागपूरातही दिवसा मुसळधार पावसाने हजेरी लावली तर वर्धा जिल्ह्यातही अवकाळीच्या अतिवृष्टीने चांगलेच झाेडपले.

मंगळवारी नागपूरसह भंडारा, गाेंदिया, वर्धा जिल्ह्यात धुवांधार पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यात नदी-नाले तुडूंब भरले आहेत. मार्च ते जूनपर्यंत नेहमी काेरडी राहणारी बावनथडी नदी आठवडाभराच्या पावसाने काठाेकाठ भरली असून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नदीच्या पात्राने पुराची सीमा ओलांडली. याच नदीवर असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरण बांधकामावरून मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावातील नागरिक ये जा करतात. पुरामुळे धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. उन्हाळ्यात पूर आल्याने नागरिकही हैरान झाले आहेत. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

गाेंदिया जिल्ह्यातही मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. येथे सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर सर्वाधिक फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मक्याचे पीक भिजल्याने शेतकऱ्यांना केलेला लागवड खर्चसुद्धा भरून काढणे कठीण झाले आहे. वर्धा जिल्ह्यालाही जाेरदार पावसाचा तडाखा बसला. वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस थांबून-थांबून धुवाधार बरसत आहे. सोमवारी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परिसरात मेघगर्जनेसह वादळीवाऱ्यासह गारपीट व पावसाने हजेरी लावली. या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत १०८ गावांतील ३०४ कुटुंब बाधित झाले आहेत. तर १५७.२६ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर ३२ गोठ्यांची पडझड झाली असून २७५ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या नैसर्गिक संकटामुळे आतापर्यंत एकूण ७५ जनावरांचा मृत्यू झाला.

४४५ टक्के अधिक पाऊस

विदर्भात एप्रिल महिन्यात झालाच तर १७.७ मिमी सरासरी पावसाची नाेंद हाेते पण यंदा ९६.५ मिमी म्हणजे ४४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागपुरात ३४७ टक्के, भंडारा ३७७ टक्के, गाेंदिया ३५१ टक्के, वर्धा ४३४ टक्के, चंद्रपूर ३१४ टक्के, यवतमाळ ७६१ टक्के, अमरावती सर्वाधिक ७७६ टक्के तर बुलढाणा ७०३ व वाशिम ६९६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस