शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

By admin | Published: February 05, 2016 2:43 AM

तब्बल १२ वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त साधण्यात जिल्हा परिषदेला अखेर यश आले आहे.

प्रतीक्षा संपली : मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची उपस्थितीनागपूर : तब्बल १२ वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त साधण्यात जिल्हा परिषदेला अखेर यश आले आहे. उद्या, शनिवारी, ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.जिल्हा परिषदेने तत्कालीन अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण सभेत बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, प्रशासनाला बांधकाम, पर्यावरणासह इतर विविध विभागाच्या १६ परवानगी मिळविण्यासाठी तब्बल १२ वर्षे लागली. त्याचप्रमाणे सत्तापक्षाचे दुर्लक्ष व प्रशासनाचा गलथान कारभारही यासाठी कारणीभूत ठरला. त्यानंतर समाज कल्याण सभापती दीपक गेडाम यांनी पुतळा उभारण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन पाठपुरावा सुरू केला. पुतळा उभारण्यासाठी जि.प. सदस्य सुरेंद्र शेंडे यांनीही उपोषणाचा इशारा देऊन शासन, प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वांच्याच प्रयत्नाने हा पुतळा १३ आॅक्टोबर २०१५ रोजी जि.प. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बसविण्यात आला. संविधान दिनी २६ नोव्हेंबरला या पुतळ्याचे लोकार्पण होणार होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाच्या धावपळीमुळे अनावरणाचा मुहूर्त लांबनीवर पडला. अखेर ६ फेबु्रवारीला पुतळ्याचे अधिकृत अनावरण केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)