शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

कळमन्यात एक लाख पोत्यांपर्यंत लाल मिरचीची आवक !

By मोरेश्वर मानापुरे | Published: February 20, 2024 7:54 PM

सर्वाधिक सेस वसुलीनंतरही बाजारात पायाभूत सुविधांचा अभाव

नागपूर: यावर्षी कळमना बाजारात लाल मिरचीची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव उतरले आहेत. गत सोमवारी ९० हजार ते १ लाख पोते (प्रति पोते ४० ते ५० किलो) आणि या आठवड्यात सोमवारी ५० ते ६० हजार पोत्यांची आवक झाली. भाव प्रति किलो १३० ते २१० रुपयादरम्यान आहे. तेजा-४ ब्रॅण्ड १८० ते २१० रुपये किलो विकला जात आहे. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे.

कळमना मिरची बाजार असोसिएशनचे अध्यक्ष महेश बांते म्हणाले, कळमना मिरची बाजार आठवड्यात केवळ सोमवारी सुरू असतो. याच दिवशी लिलाव होतो. लिलावानंतर माल बाजारात ठेवला जातो. यावर्षी डिसेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण भीती दूर होऊन मालाची विक्रमी आवक आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत. मिरचीची मागणी देशविदेशात आहे. सध्या मांढळ, राजुरा, चंद्रपूर, कागजनगर, आरमोरी, भिवापूर, वणी, वरोरा, बुलढाणा, चिखली, सिरोंचा, वरूड, मोर्शी, तारसा, मौदा येथून मिरचीची आवक आहे. जानेवारीपासून सुरू झालेली आवक मे महिन्यापर्यंत राहील. 

यंदा मिरचीला जास्त मागणीयावर्षी मिरचीचे उत्पादन वाढले असून आवक वाढली आहे. सोबतच अन्य देशांमधून मागणीत वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात सोमवारी आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव १० ते २० रुपये किलोने कमी आहेत.

सर्वाधिक सेस वसुली; मात्र रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांचा अभावमहेश बांते म्हणाले, एमपीएमसीला कळमना मिरची बाजारातून सर्वाधिक सेसची वसुली करण्यात येते. पण सुविधांचा अभाव आहे. या बाजारलगतचा भाजी बाजार अन्य ठिकाणी नेण्याचे म्हटले जाते. पण त्यावर अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांपासून समस्या सोडविल्या जात नाहीत. व्यापाऱ्यांकडे माल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा नाही. गेल्यावर्षी या बाजारातील लाखो रुपयांची मिरची आगीत जळाली होती. वर्षानंतरही आग विझविण्याची सक्षम व्यवस्था अद्यापही उभारली नाही. केवळ निविदा काढण्याची माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी बाथरूमची व्यवस्था नाही. भाजी बाजारात ट्रक रस्त्यावर उभे राहत असल्याने मिरची बाजारात पोहोचण्यात अडचणी येतात. अनेकदा ट्रक मिरची बाजारात पोहोचण्यासाठी रस्त्यातील अडथळे व्यापारी व शेतकऱ्यांना दूर करावे लागतात. पिण्याचे पाणी, शौचालय आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या बाजाराकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चोरीचे प्रमाण वाढलेमिरची बाजारात मालाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरीचे व्हिडिओ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दाखविल्यानंतरही कारवाई आणि उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून त्यांची आंदोलनाची भूमिका आहे.

कळमना मिरची बाजारात किलो दर :तेजा-४ १८०-२१०मांढळ १४०-१५५मांढळ तेजा १६०-१७५बीडी १३०-१५०५५३१ ब्रॅण्ड १३०-१५०आरमोरी १४०-१५०भिवापूर १६०-२००

टॅग्स :nagpurनागपूर