लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. शहराचा पारा ४४.५ नोंदविला गेला. कालच्यापेक्षा या तापमानात ०.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे तर मागील आठवडाभर कायम पहिल्या स्थानावर असलेले अकोला शहराचे तापमान आज दुसऱ्या स्थानावर घसरले.दरवर्षी विदर्भात नागपूरचे तापमान अधिक असते. यावर्षी वातावरणातील बदलामुळे आणि ढगाळ हवामानामुळे तापमान कमी-अधिक होत होते. गुरुवारी मात्र या उन्हाळ्यात प्रथमच नागपूरकरांनी उष्णतेची लाट अनुभवली. लॉकडाऊन शिथिल झाल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील रस्ते बºयापैकी वाहत होते. मात्र दुपारनंतर रस्ते ओस पडले. रोजच्यापेक्षा अधिक ऊन जाणवत असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम जाणवत असला तरी, विदर्भात मात्र त्याचा कसलाही परिणाम जाणवणार नसल्याचे वेधशाळेने दोन दिवसापूर्वी सांगितले होते. एवढेच नाही तर या आठवड्यात तापमान चांगले राहील, असाही अंदाज व्यक्त केला होता. त्याचा अनुभव गुरुवारी नागपूरकरांना आला.शहराच्या तापमानात कालच्यापेक्षा ०.३ अंशाने वाढ झाली. विदर्भात नागपूरचे तापमान सर्वाधिक नोंदविले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर आणि अकोला शहरांमध्ये ४४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. चंद्रपूरचा पारा १.२ अंशाने वाढला असून अकोल्याचा पारा ०.६ अंशाने घसरला आहे.असे होते गुरुवारचे तापमानअकोला ४४.२ अंश सेल्सिअसअमरावती ४२.६बुलडाणा ४०ब्रह्मपुरी ४१.५चंद्रपूर ४४.२गडचिरोली ४२.०गोंदिया ४३.०नागपूर ४४.५वर्धा ४३.२वाशिम ४२.४यवतमाळ ४३.७
उपराजधानी तापली : नागपूर @ ४४.५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:21 PM
गुरुवारी नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. शहराचा पारा ४४.५ नोंदविला गेला. कालच्यापेक्षा या तापमानात ०.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे तर मागील आठवडाभर कायम पहिल्या स्थानावर असलेले अकोला शहराचे तापमान आज दुसऱ्या स्थानावर घसरले.
ठळक मुद्देविदर्भातील सर्वात उष्ण शहर