लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांच्या चाचणीचा मागील डाटा आय.सी.एस.आर.कडून त्यांच्या पोर्टलवर टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आय.सी.एम.आर.कडून शहरातील २२,२५८ चाचणीचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. यात नागपूरच्या ७४३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समाविष्ट आहे. आता हे रुग्ण कोरोनाबाधित नसल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, अशी माहिती बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
कोविड - १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त लेबॉरेटरीकडून चाचणी केलेल्या कोरोना रुग्णांची अद्ययावत माहिती आय.सी.एम.आर.च्या पोर्टलवर टाकण्यात आली नव्हती. मनपाच्या निर्देशानंतर ही माहिती मागच्या काही दिवसात पोर्टलवर टाकण्यात आली आहे. मागील डाटा आता अपलोड केल्यामुळे कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येमध्ये वाढ दिसत आहे. अशी माहिती आयुक्तांनी दिली.