नागपूर : अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी महावितरणकडून आज, बुधवारी उत्तर नागपुरातील उप्पलवाडी, टेका नाका परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत उप्पलवाडी, टेका नाका, पटेल नगर, महेंद्रनगर, फारूकनगर, सिद्धार्थनगर, यशोधरानगर, हबीबनगर, एकटा कॉलनी, यादवनगर, नरीगाव, स्वामीनगर, राणी दुर्गावती चौक, पंचशीलनगर, सुजातानगर येथील वीज पुरवठा बंद राहील.
शांतीनगर, दहीबाजार, मुदलियार चौक, डिप्टी सिग्नल, कावरापेठ येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत, सकाळी ८ ते ११ या वेळेत किनखेडे ले-आऊट, जामदारवाडी, मेहंडीबाग कॉलनी, दुपारी १२ ते २.३० या वेळेत चिखली, कळमना मार्केट परिसर, सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत विनोबा भावेनगर, नागसेननगर, कुंदनलाल गुप्तानगर, टांडापेठ, खैरीपूर, नाईक तलाव, ठक्करग्राम, बिनाकी मंगळवारी, मोमीनपुरा, अन्सारनगर, डोबीनगर, चंद्रलोक बिल्डिंग परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.