लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत आता महामेट्रोनागपूरनेमेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डीपीआरमध्ये मंजूर खर्चातही बचत होत आहे.महामेट्रो नागपूरच्या ‘डीपीआर’प्रमाणे मेट्रोचे संचालन आणि देखरेखीसाठी २५ वर्षांच्या कालावधीत १४,४९१ कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे तर डिजिटल माध्यमाचा वापर करून या कालावधीत महामेट्रोची १,४५० कोटींची बचत होणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम करीत असताना बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास १० ते १७ टक्क्यापर्यंत बचत करता येते. यामुळे भविष्यात नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.५डी बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या महामेट्रोने आता ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एक नवे आयाम स्थापित केले आहे. ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा मदतीने संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी नवी डिजिटल प्रणाली प्रारंभ केली आहे. यामुळे संपत्तीची माहिती साठवून ठेवण्यास मदत मिळते. आजच्या युगात तांत्रिक ज्ञानाच्या प्रवाहात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध मार्गाने प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करता येतो. जगभरात भव्य बांधकामासाठी या तंत्रज्ञाचा उपयोग होत असला तरीही मोजक्या संघटनांनी याचा संपूर्ण लाभ घेतला आहे. निर्माणाधीन बांधकामात बीआयएमचा वापर केल्यास प्रकल्पाला मोठा फायदा होतो. महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या संपूर्ण निर्माण प्रक्रियेत बीआयएमचा उपयोग होत आहे.बांधकाम क्षेत्रात प्रचलित असलेल्या ६डी बीआयएम तंत्रज्ञानाने अनेक पायाभूत सुविधेने परिपूर्ण प्रकल्पाचे निर्माण केले आहे. सामान्यत: एखाद्या मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी आराखडा आणि बांधकाम प्रक्रियेत लागतो. तर ४० ते ४५ वर्षांचा कालावधी संचालन, दुरुस्ती आणि देखभालीच्या कार्यासाठी लागतो. याचा संपूर्ण अभ्यास केला असता मेट्रोच्या गुंतवणुकीच्या खर्चापैकी तब्बल ८० टक्के खर्च संचालनासाठी होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे या खर्चात बचत करण्यासाठी महामेट्रोने नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ६-डी बीआयएम तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. प्रकल्पाचे कार्य सुरू असतानाच डिजिटल माध्यमाची निवड केल्याने भविष्यात संचालन आणि देखरेखीत महामेट्रोची मोठी बचत होणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पात अत्याधुनिक ६डी बीम तंत्रज्ञानाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 1:01 AM
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुन्हा एक पाऊल पुढे टाकत आता महामेट्रो नागपूरने मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक ६डी बीआयएम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डीपीआरमध्ये मंजूर खर्चातही बचत होत आहे. महामेट्रो नागपूरच्या ‘डीपीआर’प्रमाणे मेट्रोचे संचालन आणि देखरेखीसाठी २५ वर्षांच्या कालावधीत १४,४९१ कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे तर डिजिटल माध्यमाचा वापर करून या कालावधीत महामेट्रोची १,४५० कोटींची बचत होणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम करीत असताना बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास १० ते १७ टक्क्यापर्यंत बचत करता येते. यामुळे भविष्यात नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
ठळक मुद्दे१४५० कोटींची होणार बचत : नागरिकांना होणार फायदा