लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही. तरीसुद्धा अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी चायना पावडरने पिकविलेली फळे सेवन केल्याने आरोग्यास धोका होत नसल्याचा दावा करीत आहे. परंतु एफडीएने पाच दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने कळमना बाजारातील काही फळ विक्रेत्यांकडून चायना पावडर व पिकविण्यात आलेल्या फळांचे सॅम्पल घेतले. हे सॅम्पल एफडीएने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहे.लोकमतला चायना पावडरमुळे फळ पिकविण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यासंदर्भात लोकमतच्या टीमने शुक्रवारी कळमना फळ बाजारात सर्व्हे केला. तिथे आंब्याची छाननी केल्यानंतर आंबे प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवून चायना पावडरच्या तीन पुड्या टाकण्यात येत होता. काही फळ व्यापारी आंब्याच्या ढिगाऱ्या
नागपुरात फळ पिकविण्यासाठी चायना पावडरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:24 PM
कळमना बाजारात फळ पिकविण्यासाठी आता चायना पावडरचा उपयोग करण्यात येत आहे. पूर्वी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर फळ पिकविण्यासाठी होत होता. परंतु या पावडरमुळे कॅन्सरचा धोका होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. आता त्या जागी चायना पावडर आले आहे. चायना पावडरने पिकविण्यात येणाऱ्या फळांच्या सेवनाने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही, अद्यापतरी याचा खुलासा झाला नाही.
ठळक मुद्देकॅल्शियम कार्बाईडच्या जागी फळांच्या पेट्यांमध्ये चायना पावडरच्या पुड्यागेल्या आठवड्यात एफडीएने घेतले सॅम्पल