शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी ‘डमी’ चेहऱ्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:02 PM

शहरातील गँगस्टर डमी चेहऱ्यांना समोर करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या रस्त्यातून हटवित आहेत. अलीकडे झालेल्या हत्येच्या घटना याचे संकेत देतात. यात पलास दिवटे, कार्तिक तेवर आणि विजय मोहोड हत्याकांडाचा प्रामुख्याने समावेश आहे. तिन्ही गुन्ह्यातील आरोपींनी खरे कारण लपवून पोलिसांची दिशाभूल केली आहे.

ठळक मुद्देमुख्य सूत्रधार पडद्यामागेच : कार्तिक,पलास, विजय मोहोडच्या हत्येतही ‘गोलमाल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील गँगस्टर डमी चेहऱ्यांना समोर करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या रस्त्यातून हटवित आहेत. अलीकडे झालेल्या हत्येच्या घटना याचे संकेत देतात. यात पलास दिवटे, कार्तिक तेवर आणि विजय मोहोड हत्याकांडाचा प्रामुख्याने समावेश आहे. तिन्ही गुन्ह्यातील आरोपींनी खरे कारण लपवून पोलिसांची दिशाभूल केली आहे.गेल्या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हेगार पलास दिवटेची हत्या हुडकेश्वर येथील वेडा हरी गावात करण्यात आली होती. पलासलाही विजय मोहोडच्या हत्येतील मूख्य सूत्रधार अभय राऊतने मारले होते. पलास एकेकाळी अभयला मानत असते. त्याला ‘भाऊ’ म्हणायचा. परंतु मागील काही वर्षात गुन्हेगारी विश्वात त्याचेही नाव झाले. त्याने अभयला भाऊ म्हणणे बंद केले. अभय हा बिट्स गँगशी जुळलेला होता. पलासचे उमरेड रोडवर जुगार आणि सट्ट्याचे अड्डे आहे. पलास त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला होता. त्यामुळे अभयने संकेत मिळताच पलासची साथीदाराच्या मदतीने हत्या केली. हुडकेश्वर पोलिसांनी अभयसह चार आरोपींना अटक केली होती. अभयने स्वत:च ठाण्यात जाऊन समर्पण केले होते. अभयने ठरलेल्या योजनेंतर्गत एकट्यानेच पलासची हत्या केल्याचे सांगितले होते. परंतु तपासाच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारालाही अटक केली होती.अभयने दुसऱ्याच्या इशाऱ्यावर पलासची हत्या केली होती. यामुळे काही दिवसातच त्याची व त्याच्या साथीदारांची जामीनावर सुटका झाली. आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्यात दक्षिण नागपुरातील ‘कैथवास’ ने मोठी भूमिका बजावली होती. थोड्या दिवसातच जामीन मिळाल्याने अभयला यंत्रणेचे हात कमजोर असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे त्याने विजयची हत्या करण्यासाठीही मागे पुढे पाहिले नाही. त्याचप्रकारे १९ मे रोजी कुही येथील डोंगरगाव स्थित फार्म हाऊसवर गुन्हेगार कार्तिक तेवरची हत्या करून त्याचा मित्र साहीलला जखमी करण्यात आले होते. मनीषनर येथील रहिवासी संदीप कौशीक आमि शुभम वानखेडेने १९ मे रोजी डोंगरगाव येथे आपल्या जन्मदिवसाची पार्टी आयोजित केली होती. यात दोन्ही मित्रांना निमंत्रित केले होते. संदीपने बोलवल्याने कार्तिक, सूरज आणि साहिल नावाच्या मित्रांसोबत गेला होता. यादरम्यान आरोपी आशिष मनोहरेच्या मित्रांचा काही युवकांशी वाद झाला होता. कार्तिकने फटकारल्यामुळे आशिषने त्याच्याशी वाद घातला होता.याचा बदला घेण्यासाठी पार्टीवरून परत येताना आशिष मनोहरने संतोष निनावे आणि इतर लोकांच्या मदतीने कार्तिक तेवरची हत्या केली.कार्तिक गँगस्टर दिवाकर कोत्तुलवार गँगशी जुळला होता. तो दिवाकरसोबत एमआयडीसीच्या मोंटी भुल्लर हत्याकांडातही सहभागी होता. मोंटीच्या हत्येनंतरच तो गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला होता. कमी वेळातच त्याने आपला धाक निर्माण केला होता. त्याची हत्या करणारे अतिशय कमजोर खेळाडू होते. पार्टीत जाण्यापूर्वी कार्तिक खामल्याच्या गोलूसोबत होता. गोलूने त्याला नशेसाठी एमडी दिली होती. पार्टीत कार्तिकसोबत बाल्या गावंडे हत्याकांडाचा आरोपी जय होता. त्याने कार्तिकला पार्टीत खूप दारू पाजली होती. बाल्याच्या हत्येनंतर जय चर्चेत होता. त्याचप्रकारे गोलू सुद्धा क्रिकेट सट्टा आणि एमडीचा मोठा व्यापारी असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर गोलू व जयची भूमिकाही संशयास्पद दिसून येते. विजयच्या हत्येचा तपासही गांभीर्याने न केल्यास त्याचाही परिणाम दिवटे आणि कार्तिक तेवर हत्याकांडाप्रमाणे होईल.सर्रासपणे सुरू आहेत जुगार अड्डेउमरेड रोडवर जुगार अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. आठ महिन्यांपूर्वी पलास दिवटेच्या हत्येच्या प्रकरणातच येथील जुगार अड्ड्याची भूमिका समोर आली होती. परंतु कारवाई झाली नाही. हे अड्डे हुडकेश्वर आणि कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ आहेत. यामुळे दोन्ही ठाण्यातील पोलीस एकमेकांकडे बोट दाखवित असतात. मिळालेल्या माहितीनुसार जुगार अड्ड्यातील कमाईचा मोठा हिस्सा या पोलिसांकडेही जातो. खरा प्रकार समोर यावा म्हणूनच पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवली आहे.गुन्हेगार करताहेत दिशाभूलविजय मोहोडची हत्याही सुनियोजित पद्धतीने करण्यात आली आहे. यामुळेच अभय राऊत आणि सूरज कार्लेवार पोलिसांना कुठलीही माहिती सांगत नाही आहेत. ते त्यांच्याशिवाय केवळ निखिल तिडकेचेच नाव घेत आहेत. अभय क्रूर प्रवत्तीचा गुन्हेगार आहे. त्याला माहिती आहे की, त्याच्यावर ज्याचा हात आहे, त्या सूत्रधाराचे नाव सांगितले तर सुटण्याचा मार्ग बंद होईल. तसेच जीवालाही धोका निर्माण होईल. त्यामुळे तो पोलिसांची दिशाभूल करीत आहे.तिसऱ्या साथीदारालाही अटकदरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी विजयच्या हत्येत सहभागी असलेल अभय राऊत आणि सुरज कार्लेवार त्यांचा साथीदार निखील तिडके यालाही बुधवारी अटक केली. हत्येनंतर निखील फरार झाला होता. निखील सुद्धा या हत्येत आणखी कुणी सहभागी असल्याचे नाकारत आहे. परंतु सूत्रानुसार विजयच्या हत्येत अनेक गुन्हेगार सामील आहेत. काहींनी पडद्याच्या मागून काम केले तर काही थेट जुळले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून