शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी वापर : आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:13 PM

कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआईसगोला, कुल्फी, सरबतमध्ये सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उपराजधानीचे तापमान ४३ अंशापर्यंत गेले आहे. अंगाची लाही लाही होऊ लागली असताना कोल्डड्रिंक, रसवंती, निंबूशरबत, आइसक्रीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखादा बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयांत टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो किंवा तो कसा तयार होतो, त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही याची कुणीच खातरजमा करत नाही. शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या ‘कूलिंग’साठीच अखाद्य बर्फ तयार करतात. केवळ दोनच कंपन्या ‘आईसक्यूब’ तयार करतात. हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठे हॉटेल्स, बीअरबार येथेच होतो. कूलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. अखाद्य बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनाना थंडावा (कूलिंग) देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात, असे असतानाही अन्न औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही म्हणून काहीजण खासगी टॅँकरचे पाणी वापरतात. तर काही कारखाने विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आहे की नाही, याचीही तपासणी होत नाही. बहुसंख्य बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होत असल्याचे चित्र आहे.फूटपाथवर विकला जातो बर्फशहरातील अनेक महत्त्वाच्या चौकातील फूटपाथवर सर्रास बर्फाची विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फाला ऊन लागू नये म्हणून तो ठेवण्याच्या जागेवर अंथरली जाणारी पोती तसेच बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती अत्यंत घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यातच असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरवणारा असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बहुसंख्य आईस गोलावाले, कुल्फीवाले, निंबू शरबत व उसाचा रसवाले येथून हा बर्फ घेऊन जातात.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर