मल्टिव्हिटॅमिन्स आरोग्यासाठी खरेच गरजेचे आहे का, मल्टिव्हिटॅमिन्समुळे वय वाढणे, हार्टअटॅकपासून बचाव, स्मरणशक्ती उत्तम होणे, केशगळती थांबवणे शक्य आहे का? मल्टिव्हिटॅमिन्स घेतल्याने वजन वाढवणे किंवा कमी करता येऊ शकते का की हा एक भ्रामक प्रचार आहे, असे अनेक प्रश्न आजघडीला उपस्थित होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही माहिती उपयुक्त ठरते.
काही विशेषज्ञांच्या मतानुसार मल्टिव्हिटॅमिन्स लाभदायक व गरजेचे आहे, आम्ही काय करावे?
अनेकांच्या मतानुसार मल्टिव्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा मेळ दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र, या संदर्भात ठोस असा कोणताच पुरावा देता येत नाही. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डॉ. सेसो यांच्या मतानुसार मल्टिव्हिटॅमिन्स हे एक आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग असू शकतात. मल्टिव्हिटॅमिन्स कमी किमतीचे आणि जास्त जोखमीची औषधे आहेत. ही औषधे काही लोकांच्या आहारातील उणिवा दूर करू शकतात. मल्टिव्हिटॅमिन्स घेण्याची काही ठोस कारणे असू शकतात. जसे रेटिनाचा आजार किंवा कर्करोगाच्या उपचारादरम्यान किंवा दीर्घकालीन डायरिया, दारूचे व्यसन, दीर्घकालीन लिव्हर व किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्ण किंवा बेरियाट्रिक सर्जरीनंतर, ही ती ठोस कारणे आहेत.
हृदयाच्या रुग्णांसाठी मल्टिव्हिटॅमिन्स योग्य ठरतील का?
हृदयरोग, हा अचानक येणाऱ्या मृत्यूचे जगातील सर्वात मोठे कारण आहे. अशा प्रकरणांत मल्टिव्हिटॅमिन्सचे फायदे कोणत्याही संशोधनात आढळून आलेले नाहीत. डॉक्टरांची पत्रिका दी फिजिशियनद्वारे, एका दशकापासून दररोज मल्टिव्हिटॅमिन्स घेणाऱ्या मध्यम वयोगटातील १४,००० नागरिकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात हार्टअटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा आकस्मिक मृत्यूंच्या प्रकरणात कोणतीही घसरण दिसून आलेली नाही. याउलट, किमान तीन वर्षापासून मल्टिव्हिटॅमिन्स घेत असलेल्या महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संख्येत उल्लेखनीय घसरण बघण्यात आली आहे.
कर्करुग्णांना मल्टिव्हिटॅमिन्सचे कोणते फायदे?
या प्रश्नाचे उत्तर निश्चित असे देता येत नाही. काही संशोधनांत मल्टिव्हिटॅमिन्समुळे कर्करोगाबाबतची जोखीम कमी होत नाही तर काही संशोधनांत जोखीम आणखी वाढते. मल्टिव्हिटॅमिन्स घेत असलेल्या मध्यम वयातील लोकांमध्ये कर्करोगाबाबतची जोखीम कमी झाल्याचे कोणतेही संकेत आढळलेले नाही. फायबरयुक्त आहार, फळे आणि भाज्या निश्चितच उत्तम असे पर्याय आहेत. नियमित व्यायाम आणि धूम्रपान-अल्कोहोलपासून लांब राहणे, हे लाभदायक ठरते.
डोळ्यांना काय फायदा होतो?
वाढत्या वयासोबत डोळ्यांचा मॅक्युला कमजोर होणे, हे जगभरातील नागरिकांमध्ये येणाऱ्या अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. एका संशोधनानुसार मल्टिव्हिटॅमिन्स व ॲण्टिऑक्सिडेंट्स या प्रक्रियेला मंद करण्यास सहायक ठरू शकते.
मल्टिव्हिटॅमिन्समुळे कोणते नुकसान आहेत?
आपल्याला कमजोरी किंवा थकवा, जाणवू शकतो. भूक कमी होऊ शकते किंवा वजन वाढण्याची शक्यता असते. मांसपेशींमध्ये वेदना, ताण या शिवाय सांध्यातील दुखणे वाढू शकते. अशा तऱ्हेच्या बहुतांश लक्षणांमध्ये मल्टिव्हिटॅमिन्स घेण्याची इच्छा अनेकांमध्ये असते. मात्र, अनेकांना या लक्षणांमुळे थायरॉईड, आर्थरायटिस, डायबिटीज किंवा किडनी, लिव्हर, टीबीसारख्या परिणांमाना सामारे जावे लागू शकते. त्यामुळे, डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरेल. बरेचदा तुम्हाला दुसरा कोणताही आजार झालेला असू शकतो.
मल्टिव्हिटॅमिन्सचे सर्वसामान्य दुष्परिणाम कोणते?
काही लोकांना अपच, हगवण किंवा मतलीच्या तक्रारी उद्भवू शकतात. काही दुर्लभ दुष्परिणामांमध्ये डोकेदुखी, गाऊट, अनिद्रा किंवा नाकातून रक्त वाहणे, आदींचा समावेश होतो. गरजेपेक्षा अधिक मल्टिव्हिटॅमिन्सचे सेवन अनेक दुष्परिणामांचे कारण ठरू शकते.
विशेष अशा मल्टिव्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर?
कुपोषित युवकांमध्ये अनेक प्रकारच्या मल्टिव्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. अशा लोकांना मल्टिव्हिटॅमिन्स लाभकारक ठरू शकतात. टीबीवरील उपचार घेत असलेल्यांना बी ६ किंवा पायरिडॉक्सिनचा फायदा होऊ शकतो. ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेट्समध्ये व्हिटॅमिन डी गरजेचे आहे. दीर्घकालीन मद्यपींना थियामिनसह मल्टिव्हिटॅमिन्सचा लाभ होऊ शकतो. बेरियाट्रिक सर्जरी झालेल्या रुग्णांना हृदयाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सेलेनियम गरजेचे ठरू शकते. गर्भावस्था आणि सिकलसेलच्या आजारात फॉलिक ॲसिड महत्त्वाचे आहे.
.................
‘’?!