लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि. या कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्यावतीने देण्यात आली.करारानुसार रेल्वे स्थानकांच्या इमारतीवर ५.७४ कोटी रुपये किमतीचे ८८३ किलोवॅटचे युनिट बसविण्यात येईल. ज्यातून अखंडित वीज पुरवठा होईल. या युनिटमुळे वर्षाकाठी ६७.३ लाख रुपयांची बचत होईल. एक किलोवॅट सोलर प्लांट बसविण्यासाठी ६५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. गत वित्त वर्षात ७८ रेल्वे स्थानकांवर १०० टक्के एलईटी लाईट बसविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
१८ रेल्वे स्थानकांवर होणार सौैर ऊर्जेचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 9:13 PM
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि. या कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्यावतीने देण्यात आली.
ठळक मुद्देप्रकल्पासाठी खासगी कंपनीसोबत होणार करार