शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

न्यायमूर्तींची रिक्त पदे वाढणार

By admin | Published: May 01, 2017 1:02 AM

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा प्रश्न चिंताजनक स्वरूपाचा असून तातडीने नवीन नियुक्त्या केल्या गेल्या नाहीत तर,

नवीन नियुक्त्यांची गरज : यावर्षी होताहेत पाच न्यायमूर्ती निवृत्त राकेश घानोडे  नागपूर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा प्रश्न चिंताजनक स्वरूपाचा असून तातडीने नवीन नियुक्त्या केल्या गेल्या नाहीत तर, या चिंतेमध्ये येणाऱ्या काळात आणखी भर पडणार आहे. यावर्षी मुंबई उच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे स्थायी न्यायमूर्तींच्या रिक्त पदांची संख्या १६ वरून वाढून २१ होणार आहे. न्या. व्ही. एम. कानडे २१ जून, न्या. एफ. एम. एस. रोसारिओ डोस रईस ९ आॅगस्ट, न्या. अनुप मोहता ३ डिसेंबर, मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर ४ डिसेंबर तर, न्या. इंदिरा जैन १९ डिसेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालय हे न्या. चेल्लूर यांचे पालक न्यायालय असून, त्यांची २२ आॅगस्ट २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. न्या. कानडे आॅक्टोबर - २००४, न्या. मोहता नोव्हेंबर - २००५, न्या. रईस जानेवारी - २०१३ तर, न्या. जैन नोव्हेंबर - २०१६ पासून स्थायी न्यायमूर्ती म्हणून कार्य करीत आहेत. २०१८ मध्ये तीन न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार आहेत. त्यात न्या. शंतनू केमकर (२२ आॅक्टोबर २०१८), न्या. वासंती नाईक (२ मे २०१८) व न्या. राजेंद्र सावंत (५ डिसेंबर २०१८) यांचा समावेश आहे. रिक्त पदांची समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने नवीन नियुक्त्यांबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. एकूण ३३ पदे रिक्त मुंबई उच्च न्यायालयात स्थायी न्यायमूर्तींची १६ व अतिरिक्त न्यायमूर्तींची १७ अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत. मंजूर पदांची संख्या ९४ (स्थायी - ७१ व अतिरिक्त - २३) असून, सध्या ६१ (स्थायी - ५५ व अतिरिक्त - ६) न्यायमूर्तीच कार्यरत आहेत. अतिरिक्त न्यायमूर्तींची सुरुवातीची दोन वर्षे परीविक्षा काळ असतो. या काळातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात येते.