लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराकरिता कोव्हॅक्सिन लसीचा मर्यादित साठा प्राप्त झाल्यामुळे बुधवारी शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण फक्त तीन केंद्रावर होणार आहे. यामध्ये स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा समावेश आहे.
लस उपलब्ध नसल्याने बुधवारी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नसल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी १२ केंद्रावर लसीकरण सुरू होते. १३७५ जणांना लस देण्यात आली. सहा केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील ८६८ जणांना लस देण्यात आली. तर इतर ठिकाणी २७६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.