नागपूर : शहर आणि ग्रामीण मिळून गुरुवारी ३६,६९३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यात शहरातील १४,३५७ तर, ग्रामीणमधील २०,३३० लाभार्थ्यांचा समावेश होता. कोव्हॅक्सिन लसीचा साठा संपला असताना आणि कोविशिल्ड लसीचा दोनच दिवस पुरेल एवढा साठा असल्याने प्रशासन अडचणीत आले आहे.
ग्रामीणमध्ये आज ३ आरोग्य सेवक, ५१ फ्रंटलाईन वर्कर, ४५ वर्षांवरील १२,५३४, गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील १२२३ तर ६० वर्षांवरील ६,१२५ अशा एकूण १९,९३६ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला, तर ४०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. असे एकूण २०,३३६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. शहरात २६६ आरोग्य सेवक, १३८ फ्रंटलाईन वर्कर, ४५ वर्षांवरील ७,०३४, गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील १७२० तर ६० वर्षांवरील ३,९९२ अशा एकूण १३,१५० लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. १२०७ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला. असे एकूण १४,३५७ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.