१०६ केंद्र : ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने करता येईल नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरातील १८ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आज बुधवारपासून महापालिकेसह शासकीय असलेल्या १०६ केन्द्रावर सुरू होत आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महापालिका आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १०६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असलेल्या १०६ केंद्रांवरून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व स्व. प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मेडिकल कॉलेज व स्व. प्रभाकर दटके रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.
....
१२ आठवडे झालेल्यांना दुसरा डोस
केन्द्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यापूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत होईल.
..........
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती (२१ जून)
पहिला डोस
आरोग्य सेवक-४६०७१
फ्रंट लाईन वर्कर- ५३२५६
१८ वयोगट- ३५५२४
३० ते ४४ वयोगट-१६६९५
४५ वयोगट-१४३३७३
४५ कोमार्बिड - ८४९९९०
६० सर्व नागरिक- १८११८३
पहिला डोज - एकूण -५६१०९५
दुसरा डोज :
आरोग्य सेवक- २४५४४
फ्रंट लाईन वर्कर-२१२५३
१८ वयोगट- ७२४३
४५ वयोगट- ३३९८९
४५ कोमार्बिड - २००८६
६० सर्व नागरिक-८१७८३
दुसरा डोज - एकूण - १८८८९८
संपूर्ण लसीकरण एकूण : ७४९९९३