नागपूर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण होणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत कार्यकर्ते विविध वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत.
समाजातील सर्वच स्तरांतील लोकांनी लस घ्यावी यासाठी अभाविप नागपूर महानगरद्वारा संपूर्ण महानगरात कोरोना लस जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. विशेषतः झोपडपट्टी तसेच वंचितांच्या घरांमध्ये जाऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. सुरुवात नागपुरातील इसासनी व रामेश्वरी वस्तीपासून करण्यात आली. यावेळी लोकांना घरोघरी जाऊन अभाविप कार्यकर्त्यांद्वारा जनजागृती करण्यात आली. सोबतच वस्तीतील प्रत्येक घर सॅनिटाईज करण्यात आले. सद्य:स्थितीत लसींचा तुटवडा असला तरी लस उपलब्ध झाल्यावर कसलीही प्रतीक्षा न करता तातडीने लस घ्यावी, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
===Photopath===
130521\13ngp_74_13052021_2.jpg
===Caption===
अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून वंचितांच्या घराचे सॅनिटायझेशनदेखील करण्यात येत आहे.