काेंढाळी : प्राथमिक आराेग्य केंद्र व काेंढाळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने परिसरात लसीकरण जनजागृती माेहीम राबविली जात असून, यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे तर १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
काेंढाळी आराेग्य केंद्रात २२ मे पर्यंत १,०६१ लाभार्थी शिल्लक हाेते. यासाठी सरपंच केशव धुर्वे यांनी लसीकरण जनजागृती करीत नागरिकांना प्राेत्साहित केले. त्यानुसार साेमवारी ग्रामपंचायत सभागृहात लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी काटाेल पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांत व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री वाळके, डाॅ. अश्विनी दातीर, डाॅ. सुहास माेरे यांची उपस्थिती हाेती. शिबिरात १११ जणांना लस देण्यात आली तर आराेग्य केंद्रात ११ नागरिकांचे लसीकरण झाले. सरपंच केशव धुर्वे, ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंग राठाेड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी शिबिराच्या आयाेजनासाठी सहकार्य केले.