कामठी : खैरी (ता. कामठी) येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने काेराेना लसीकरणाला शनिवार (दि. २७) पासून सुरुवात करण्यात आली. येथील केंद्रावर पहिल्या दिवशी ७५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती गुमथी प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल राऊत यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये तालुका प्रशासनाने ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यात खैरी येथील लसीकरण केंद्राचा समावेश असल्याचे सरपंच माेरेश्वर कापसे यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माेहन माकडे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, सरपंच मोरेश्वर कापसे, उपसरपंच वीणा रघटाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत व डॉ. वैशाली गुंडाळे, ग्रामपंचायत सदस्य नत्थू ठाकरे, दिलीप ठाकरे, हृदय सोनवणे, दिनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर, सुजाता डोंगरे, छाया कानफाडे, मुरली तळेकर आदी उपस्थित हाेते. ग्रामविकास अधिकारी नीळकंठ देवगडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.