नागपूर : कोरोना व्हॅक्सीनच्या जनजागृतीमुळे आता व्हॅक्सीनच्या बाबतीतील भीती कमी होत असल्याचे शनिवारी झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १२ केंद्रावर १,२०० लाभार्थ्यांमधून १,०५६ लाभार्थ्यांनी लसीकरण केले. एकूण ८८ टक्के लाभार्थी लसीकरण झाले. नागपूर शहरात तर ९४.४ टक्के लाभार्थ्यांनी लसीकरण केले आहे.
राज्य सरकारने १४ फेब्रुवारीपर्यंत लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे. त्याच कारणाने नागपूर महापालिकेने आता खासगी रुग्णालयातसुद्धा लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी नरेंद्र बहीरवार यांनी सांगितले शहरात सध्या ५ लसीकरण केंद्र सुरू आहे. त्याचसोबत आता १७ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रात आवश्यक सुविधांचा आढावा मनपाकडून घेण्यात आला. २७ जानेवारीपासून संबंधित खासगी रुग्णालयातसुद्धा लसीकरण केंद्र सुरू होऊ शकते.
डॉ. बहीरवार यांच्या मते २२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहे. हे १० हजार फ्रंटलाइन वर्करसाठी पर्याप्त आहे. पहिल्या टप्प्यात २६ हजार फ्रंटलाइन वर्करला लस देण्याचे लक्ष आहे. कोरोनाची व्हॅक्सीन लावून घेण्यास आता प्रतिसाद वाढला आहे.
- शहरात ९४.४, ग्रामीणमध्ये ८३.४३ टक्के लसीकरण
नागपूर शहरात शनिवारी कोरोना लसीकरणासाठी उत्साह दिसून आला. ५ केंद्रावर ५०० लाभार्थ्यांपैकी ४७२ लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. जवळपास ९४.४ टक्के लोकांनी लस घेतली. एम्स व पाचपावली केंद्रावर प्रत्येकी १३३ लोकांनी लसीकरण केले. जे लक्ष्यापेक्षा अधिक आहे. मेडिकलमध्ये मात्र ४४ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली. तर डागा मध्ये ७५, मेयोमध्ये ८७ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस लावून घेतली. ग्रामीण भागात ७०० पैकी ५८४ लाभार्थ्यांनी लस घेतली. याची टक्केवारी ८३.४३ आहे. ग्रामीणमध्ये रामटेक केंद्रावर १०५, हिंगणा ८४, कामठी ७४, काटोल ९८, सावनेर ८०, उमरेड ४५, डिगडोह ९८ लाभार्थ्यांनी लसीकरण केले.