लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरिता राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी ९६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्रांवर कोव्हॅक्सिन, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आयुर्विज्ञान संस्था ४ येथे कोविशिल्ड अशा ९६ शासकीय व मनपाच्या केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जाईल तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी आता ६ केंद्रे सुरू आहेत. यात कोव्हॅक्सिन लसीकरण स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सूतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा येथे कोविशिल्ड लसीकरण करण्यात येईल.
विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांना लस दिली जाणार आहे.
शुक्रवारचे लसीकरण नियोजन
१८ ते ४४ वयोगट - कोविशिल्ड (ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य)
इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर
आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा
पाचपावली सूतिकागृह
१८ ते ४४ वयोगट -काेव्हॅक्सिन
महाल रोगनिदान केंद्र
मानेवाडा यू.पी.एच.सी. शाहूनगर
छाप्रु सर्वोदय हॉल, छाप्रुनगर
कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस
महाल रोग निदान केंद्र
मेडिकल रुग्णालय
आंबेडकर रुग्णालय
झोननिहाय लसीकरण केंद्र (कोविशिल्ड)
लक्ष्मीनगर झोन -
खामला आयुर्वेदिक
जयताळा यूपीएससी
श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन राजीवनगर
स्पोर्ट कॉम्लेक्स बॅडमिंटन हॉल
समाज भवन, गजानननगर
सोनेगाव समाज भवन, दुर्गा माता मंदिराजवळ
गायत्रीनगर स्केटिंग हॉल
महात्मा गांधी समाज भवन, हिंगणा रोड
मनपा शाळा जयताळा
आजी-आजोबा पार्क सेंटर
गणेश मंदिर वाचनालय, तात्या टोपेनगर
धरमपेठ झोन -
इंदिरा गांधी रुग्णालय
के.टी. नगर आरोग्य केंद्र
जगदीशनगर समाज भवन
दाभा मनपा शाळा
आयुर्वेदिक दवाखाना तेलंगखेडी
टिळकनगर समाज भवन
डिक दवाखाना
बुटी दवाखाना
सदर रोग निदान केंद्र
हनुमाननगर झोन-
ईएसआय हॉस्पिटल
आजमशहा स्कूर शिवनगर
मानेवाडा आरोग्य केंद्र
दुर्गानगर शाळा, शारदा चौक
नरसाळा आरोग्य केंद्र
जानकीनगर शाळा
म्हाळगीनगर शाळा
धंतोली झोन-
एम्स हॉस्पिटल
आयसोलेशन हॉस्पिटल
बाभूळखेडा आरोग्य केंद्र
साने गुरुजी शाळा, गणेशपेठ
गजानन मंदिर समाजभवन
चिचभुवन मनपा शाळा
नेहरूनगर झोन-
केडीके आयुर्वेदिक हॉस्पिटल
नंदनवन प्रा. आरोग्य केंद्र
दिघोरी हेल्थ पोस्ट
ताजबाग हेल्थ पोस्ट
शिव मंदिर समाज भवन, नंदनवन
सितलामाता मंदिर समाज भवन
कामगार कल्याण कार्यालय, चिटणवीसनगर
बिडीपेठ इंदिरा गांधी सभागृह
गांधीबाग झोन -
मेयो हॉस्पिटल
डागा हॉस्पिटल
हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना
भालदार पुरा आरोग्य केंद्र
मोमीनपुरा मनपा शाळा
नेताजी दवाखाना
दाजी दवाखाना
मोमीनपुरा मनपा शाळा
सतरंजीपुरा झोन-
मेहंदीबाग आरोग्य केंद्र
लालगंज आयुर्वेदिक दवाखाना
कुंदनलाल गुप्तानगर मनपा शाळा
सतरंजीपुरा हेल्थपोस्ट
जागनाथ बुधवारी मुलींची शाळा
लकडगंज झोन-
बाभूळबन आयुर्वेदिक दवाखाना
पारडी मनपा दवाखाना
डिप्टी सिग्नल आरोग्य केंद
भरतवाडा प्रा. शाळा
मिनीमातानगर प्रा. शाळा
कळमना मराठी प्रा. शाळा
आशीनगर झोन -
पाचपावली सूतिकागृह
कपिल प्रा. आरोग्य केंद्र
डॉ. आंबेडकर हॉस्पिटल
वैशालीनगर प्रा. शाळा
मंगळवारी झोन-
एम.के. आझाद उर्दू शाळा
नारा आरोग्य केंद्र
इंदोरा आरोग्य केंद्र
पोलीस रुग्णालय, काटोल रोड
डिव्हिजनल रेल्वे रुग्णालय
मोलीबाग पॉलिक्लिनिक
गोरेवाडा वस्ती अंगणवाडी
जरीपटका पॉलिक्लिनिक
झिंगाबाई टाकळी प्रा. आरोग्य केंद्र
पेन्शननगर शाळा