कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्यासाठी कोणतिही मोहीम राबविण्याची आवश्यकता नाही. अशा कुठल्याही मोहिमेत आपण सहभागी नाही. काही चुका होत असतात. राज्यात मोठा पराजय होत असेल तर मंथन होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जय पराजय होत असतो. संयम महत्वाचा असतो. आता १६ ते १६० कसे होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्याच्या तिकीटासाठी हायकमांडला शिफारस करण्याचा अधिकार राज्याच्या नेतृत्वाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांना कुबड्यांचा गरज नाही. उलट कुबड्या आता फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवु शकत नाही. फडणवीस हे विदर्भाचं लेकरू आहे. त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी त्यांच्यावर बदला घेण्याचे राजकारण करणारी व्यक्ती, असा ठपका होता. तो ठपका यावेळी पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, वैयक्तिक वैर नसावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिंदे-पवार यांना फडणविसांच्या आशिर्वादाने राहावे लागणारएकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्री पद नाही घेतो तर दुसरा चेहरा तयार आहे. त्यामुळे मिळेल ते घेणे ही त्यांची मजबुरी आहे. पक्ष संभाळण्यासाठी त्यांना घ्यावंच लागेल. मुख्यमंत्री राहणाऱ्यानी मंत्री पद घेतले, त्याशिवाय पर्याय नाही. शिंदे-पवार यांना आता मोदी-फडणवीस यांच्या आशिर्वादाने राहावे लागणार. काही दिले नाही तर चुपचाप राहावे लागेल, असे चिमटे वडेट्टीवार यांनी काढले.