येवदा : दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीप्रश्न चांगलाच पेटला असून नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. पाण्यासाठी संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरण कर्मचाºयाच्या घरावर घागर मोर्चा नेला. वडनेर गंगाई येथे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. येथील वॉर्ड क्र. ४ व ५ मध्ये काही दिवसांपासून अपुरे पाणी मिळत आहे. यामुळे कंटाळून वॉर्ड क्र. ४ व ५ च्या जनतेने संजय मावळे यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणचे कर्मचारी जगदीश जोशी यांच्या फार्म हाऊसवर घागर मोर्चा काढला. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोर्चात राष्ट्रसंत महिला बचत गटातील माया रावेकर, अंजली आकोटकर, कोकिळा ढोके, वीणा नागोसे, निर्मला कंठाळे, पूनम यावले, ज्योती घाडगे, वैशाली कावरे, राजू रावेकर, राजू ढोके, अनिल हिवराळे, गोपाल माहुलकर, नीलेश देशमुख, भूषण चौधरी, उमेश माहुलकर, चांद चौधरी, मनोहर कंठाळे, जमिल शेख आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
वडनेरवासीयांचा पाण्यासाठी घागर मोर्चा
By admin | Published: May 04, 2014 12:56 AM