नागपूर : काही लोक म्हणत आहेत की लाकडी बहीण योजना सुरू ठेवू नका. मी कागद घेऊन आलो. ही यजोना बंद व्हावी म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. हे तेच आहेत जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. माजी मंत्री सुनील केदार यांचे राईट हॅण्ड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांची नियत ओळखा. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगतो, देवा भाऊ असे पर्यंत हायकोर्टात मोठा वकील उभा करू, काहिही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असे आश्वस्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले, ही योजना रोखण्यासाठी विरोधक पहिल्यांदा मुंबईच्या न्यायालयात गेले. तेथे जमले नाही. आता नागपूरच्या न्यायालयात गेले. याची नियत समजून घ्या. नागपुरात दुसऱ्या टप्प्यात ५० लाख खात्यांमध्ये पैसे दिले आहेत. १ कोटी ६० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा केले आहेत. १० टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशी वग्लना महाविकास आघाडीचे नेते करीत होते. त्यांना आव्हान आहे की या महिलांना पैसे मिळाले की नाही ते विचारा.
लाडक्या बहिणींनो मला सांगा या ठिकाण योजना आणून चूक केली का, ही योजने सुरू ठेवायची आहे ना, मुलींना मोफत शिक्षण सुरू ठेवायची आहे ना, महिलांना एसटीत पन्नास टक्के सवलत दिली, या योजना सुरू ठेवायच्या आहेत ना, मग आम्हाला आशिर्वाद द्या, असे आवाहान त्यांनी केले. ५०७ अभ्यासक्रमांसाठी मुलींच्या शिक्षणाची फी त्यांचे लाडके भाऊ भरणार आहेत. महिला या वस्तू नाहीत. त्या माता, भगिनी आहेत. ही शिकवण मुलांना द्यावी लागेल. ते महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना मोकळे सोडले जाणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी दिला.