स्वातंत्र्यापूर्वीचा जन्म असलेले अंभईकर काका आज स्वावलंबी नगर येथे निवृत्त जीवन जगत आहेत. ओल्ड मॅट्रिक असलेले अंभईकर यांनी आयटीआय, एम्प्रेस मिल येथे नोकरी केली. एम्प्रेस मिल बंद पडल्यानंतर त्यांनी अल्युमिनियम, तांबे आदी वितळवून आपल्या कलाकारीच्या छंदाला वेगळा आयाम दिला. त्यांनी जमशेदजी टाटा, पुलगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आर्मीचे प्रतीक आदी कलाकारी साकारल्या. या कलाकृती आजही संबंधित ठिकाणी शाबूत आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या १९८४ मध्ये जेव्हा नागपुरात आल्या होत्या, तेव्हा अंभईकर यांनी साकारलेल्या अखंड भारताची लाकडी फ्रेम राणीकोठी येथे एका खाजगी सोहळ्यात भेट दिली होती. त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त वंदे मातरम ही फ्रेम तयार केली आहे. तीन महिन्यात ही फ्रेम त्यांनी साकारली. येत्या २६ जानेवारी २०२२ पर्यंत ते राष्ट्रगीत जन गण मन साकारण्याच्या तयारीला लागले आहेत.
.....