लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.वाराणसी-हल्दिया या देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळखात पडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या १ हजार ३९० किलोमीटर लांबीच्या गंगेतील जलमार्गातून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेकांनी हे केवळ आश्वासनच ठरेल अशी टीका केली होती. अनेक तज्ज्ञांनीदेखील ही बाब अशक्य असल्याचा दावा केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला. या मार्गातील विविध अडथळे दूर कसे होतील याबाबत नियोजनबद्धरीतीने प्रयत्न करण्यात आले.जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील मिळणार आहे. कोलकाता येथून एका शीतपेय कंपनीच्या १२ ‘कंटेनर्स’ना घेऊन ‘एमव्ही आरएन टागोर’ ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करतील.विक्रमी वेळेत ‘टर्मिनल’ची उभारणीवाराणसी येथे विशेष ‘मल्टिमॉडेल टर्मिनल’देखील विकसित करण्यात आले असून पंतप्रधानांच्या हस्ते याचे १२ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होईल. या ‘टर्मिनल’ची उभारणीदेखील विक्रमी वेळेत पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतुकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश मानण्यात येते आहे. या जलमार्गामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.हे मोठे यश : गडकरीस्वातंत्र्यानंतर देशातील जलमार्गातून जहाजावर ‘कंटेनर्स’ येणार आहेत. जलमार्ग ही काळाची गरज आहे व त्या हिशेबाने केंद्र सरकारने पावले उचलली. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून हे एक मोठं यश आहे. महत्त्वाचे म्हणजे वाराणसी येथील ‘टर्मिनल’ पूर्ण करण्यासाठी लागलेला कमी वेळ हा देखील एक विक्रमच आहे, असे ते म्हणाले.
वाराणसी-हल्दिया जलमार्ग रचणार इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 9:03 PM
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे गंगा नदीतील जलवाहतुकीला ‘बूस्टर डोज’ मिळाला आहे. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला आहे. या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले असून पुढील आठवड्यात जलवाहतुकीच्या क्षेत्राच्या इतिहासातील एक नवे पान लिहिल्या जाणार आहे हे विशेष. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोलकात्याहून वाराणसीला जलमार्गातून १६ कंटेनर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: यावेळी तेथे उपस्थित राहणार आहेत.
ठळक मुद्देनितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे जलवाहतुकीत ‘भगीरथ’ भरारीगंगा नदीत १३०० हून अधिक लांबीचा जलमार्ग होणार सुरू