लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. या सर्व स्पर्धा १९ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित होतील. या स्पर्धांमध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१९ जानेवारीला सकाळी ९.३० वाजतापासून १२ वाजतापर्यंत ‘माय ऑरेंज सिटी’ विषयावर चित्रकला स्पर्धा होईल. ही स्पर्धा १ ते ९ आणि १० ते १४ वर्ष वयोगटात घेण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रॉर्इंग शीट उपलब्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पेन्सील आणि कलर्स सोबत आणायचे आहेत. यानंतर दुपारी १ ते ३ वाजतापर्यंत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनचे आयोजन केले जाईल. ‘ऑरेंज कलर’ ही या स्पर्धेची संकल्पना असेल. ही स्पर्धा १ ते ९ वर्ष आणि १० ते १४ वर्षे वयोगटात घेतली जाईल. यापुढे दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. ही स्पर्धासुद्धा १ ते ९ आणि १० ते १४ वर्षे वयोगटासाठी घेण्यात येणार आहे.या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नियमांशी संबंधित अधिक माहितीसाठी राजेश जोत (९४२३६२८५००, ९७३०२३८९८०) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:41 AM
लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे.
ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लबचे आयोजन