लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने धंतोली झोनमधील पार्वतीनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.वसंतनगर प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपश्चिमेस-प्रमोद उईके यांचे घरउत्तरपूर्वेस -जयाबाई गिरडे यांचे घरदक्षिणपश्चिमेस -धर्मेंद्र धनविजय यांचे घरदक्षिणपूर्वेस-मयूर निकम यांचे घरकाशीनगर प्रतिबंधित क्षेत्रउत्तरपूर्वेस -श्याम बार रेस्टॉरंटपूर्वेस - अभयनगर मार्ग (श्याम बार ते अभयनगर उद्यान)दक्षिणपूर्वेस -अभयनगर उद्यानदक्षिणेस -शताब्दीनगरदक्षिणपश्चिमेस -साई किराणा स्टोअर्सपश्चिमेस -बेलतरोडी रोड (शताब्दी चौक ते साई किराणा स्टोअर्स)पार्वतीनगर येथील कमी केलेले प्रतिबंधित क्षेत्रदक्षिणपूर्वेस -भोस्कर यांचे घरउत्तरपूर्वेस - गिरडे डेकोरेशनउत्तरपूर्वेस-वाघमारे किराणादक्षिणपूर्वेस-बैनाबाई गजभियेउत्तरपूर्वेस-श्याम मंडप डेकोरेशनउत्तरपश्चिमेस -दिनेश ट्रेडर्सदक्षिणपश्चिमेस -मौर्य सभागृहदक्षिण पूर्वेस -डहाके यांचे घरदक्षिणपूर्वेस पंकज निकोसे, वैष्णवी डकोरेशन
नागपुरातील वसंतनगर, काशीनगर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:46 AM
महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे तर बाधित रुग्ण बरा झाल्याने धंतोली झोनमधील पार्वतीनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याचे आदेश शनिवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.
ठळक मुद्देपार्वतीनगर प्रतिबंधित क्षेत्र कमी केले