शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
2
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
3
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
4
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
5
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
6
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
7
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
8
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
9
सणासुदीच्या काळात ₹10000 कोटी रुपयांची खरेदी करण्याच्या तयारीत गौतम अदानी? या बड्या कंपनीवर नजर?
10
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
11
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
12
हृदयद्रावक! वडिलांबरोबर पोहायला गेलेला, नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला
13
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
14
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
15
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
16
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
17
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
18
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा यांची तब्येत बिघडली, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
19
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
20
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन

‘वसंतोत्सवी’ उधळली शब्दसुरांची माळफुले

By admin | Published: January 11, 2015 12:51 AM

हिरव्याकंच रानवाटेने निघालेल्या एका काफिल्याला पुढच्याच वळणावर बहरलेल्या प्राजक्ताचा गंध यावा, ही फुले नक्की कुठे उमललीत याचा शोध सुरू व्हावा अन् कुठूनतरी अचानक पुढे आलेल्या

स्वरवेधचे आयोजन : सुखद स्वरानुभवाने नागपूरकर मंत्रमुग्धनागपूर : हिरव्याकंच रानवाटेने निघालेल्या एका काफिल्याला पुढच्याच वळणावर बहरलेल्या प्राजक्ताचा गंध यावा, ही फुले नक्की कुठे उमललीत याचा शोध सुरू व्हावा अन् कुठूनतरी अचानक पुढे आलेल्या नवतरुणाने त्याच्या ओंजळीतील प्राजक्तफुले त्या काफिल्यापुढे रिती करावी, असाच काहीसा अनुभव आज डॉ़ वसंतराव देशपांडे सभागृहात उपस्थितांनी घेतला़ यातील काफिला श्रोत्यांचा होता, प्राजक्त सुरांचा अन् ज्यांनी ती गंधीत ओंजळ रिती केली तो नवतरुण होता खुद्द वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे़ निमित्त होते पहिल्यांदाच मुंबई-पुण्याबाहेर झालेल्या व स्वरवेधने आयोजित केलेल्या ‘वसंतोत्सव’चे़सध्याच्या युवा पिढीमध्ये एक अग्रणी आणि शास्त्रीय संगीतातील कसलेले कलाकार म्हणून राहुल देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो़ आपल्या आजोबांच्या म्हणजे डॉ़ वसंतराव देशपांडेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी वसंतोत्सवाची सुरुवात केली आणि आज नागपूरकर श्रोत्यांनाही या उत्सव पालखीचे भोई होता आले़ १० व ११ जानेवारी अशा दोन दिवसीय या महोत्सवात आज पहिल्या दिवशी ‘राहुल हटके’ हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम सादर झाला़ मैफिल शास्त्रीय संगीताची आणि ‘राहुल हटके’ असे शीर्षक कसे, असा प्रश्न आधी श्रोत्यांना पडला खरा पण, राहुल यांचा हा शब्दकाफिला पुढे निघाला अन् श्रोत्यांना हटके या शब्दाचा अर्थ गवसत गेला़ गणिताच्या दृष्टिकोनातून जसे २४ संयोग शक्य आहेत तसेच संगीताचेही आहे़ वेगवेगळे स्वरसमूह घेऊन त्यातील असेच संयोग राहुल यांनी एकत्र केले आणि प्रत्येक राग असा कापसासारखा पिंजून पिंजून त्याची जणू सुंदर, मऊ, मखमली गादीच तयार झाली़ तू सुखकर्ता, तू दुखहर्ता.... या गणेश वंदनेने सुरू झालेली ही मैफिल पुढे तब्बल तीन तास संगीतातील विविध संयोगांनी गाजत व वाजत राहिली़ यात कधी मत्स्यगंधातील देवाघरचे ज्ञात कुणाला, हे भावस्पर्शी नाट्यपद होते तर कधी, तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी हे प्रणयगीतही होते़ कुमार गंधर्वांच्या स्वर्गीय आवाजातील आज अचानक गाठ पडे...ची प्रेमळ तरलता होती तर त्याचवेळी दयाघना तुटले चिमणे घरटेची आर्त सादही होती़बाहेर कडाक्याची थंडी अन् आत अशी शब्दांची ऊब देणारा वसंतोत्सव अन् भरात आला आणि राहुल देशपांडेंनी मेडलीला हात घातला. कुणी जाल का सांगाल का, राहिले ओठांत या, वाटेवर काटे वेचित चाललो या तिन्ही गीतांचे एकएक कडवे एकामागून एक सादर झाले अन् तुडुंब भरलेल्या सभागृहात टाळ्यांच्या रूपात एकमुखी प्रतिसाद दिला़ या संपूर्ण कार्यक्रमात राहुल यांना सचिन बक्षी, अ‍ॅड़ भानुुदास कुळकर्णी, श्रीकांत पिसे, शिरीष भालेराव, महेंद्र ढोले, अरविंद उपाध्ये आणि नंदू गोहणे यांची सुरेल साथसंगत लाभली़ निवेदन मुकुंद देशपांडे यांनी केले़ नागपुरातला वसंतोत्सव चिरतरुण राहील - सिरपूरकरनागपुरात पहिल्यांदा झालेल्या वसंतोत्सवाला रसिकाश्रय मिळाला आहे़ गच्च भरलेले सभागृह हा त्याचाच पुरावा आहे़ म्हणूनच वसंत ऋतू जसा तरुण असतो तसाच वसंतोत्सवही नागपुरात सदैव चिरतरुणच राहील, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी गौरव केला़ ते उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते़ कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले़ प्रमुख अतिथी म्हणून राहुल देशपांडे यांचे वडील विजयराव देशपांडे व एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा उपस्थित होते़ यावेळी नाट्य व संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे अप्पासाहेब इंदूरकर, डॉ़ राम म्हैसाळकर व सूरमणी पंडित प्रभाकरराव धाकडे यांचा सत्कार करण्यात आला़ विदेशात तबल्याचे सुंदर सादरीकरण करणाऱ्या अथर्व शेष याचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला़ संचालन रेणुका देशकर यांनी केले़ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सपत्नीक कार्यक्रमाला आले व त्यांनीही या सुंदर मैफिलीचा आस्वाद घेतला़ उद्या रविवारी सकाळी ९ वाजता वसंतोत्सवात कट्यार काळजात घुसली या नाटकाचा प्रयोग होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता राहुल देशपांडे व प्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर यांची स्वरा ही खास जुगलबंदी रंगणार आहे़