लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या प्रमुख कार्यकारिणीत वैदर्भीय नाट्यकर्मींनी घवघवीत यश मिळवले आहे. अवघ्या नाट्यक्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत प्रसाद (नवनाथ) मच्छिंद्र कांबळी यांच्या पॅनलने बाजी मारत १९ पैकी १६ जागांवर आपले पदाधिकारी निवडून आणले असून त्यात विदर्भातील नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, अशोक ढेरे व उज्ज्वल देशमुख यांचा समावेश आहे. नियामक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीत नरेश गडेकर यांच्या रूपाने नागपूरकर प्रतिनिधी मुख्य पदावर निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी २००३ मध्ये दिलीप ठाणेकर तर २०१३ मध्ये प्रमोद भुसारी उपाध्यक्षपदी निवडले गेले होते़ या नवनियुक्त कार्यकारिणीत प्रसाद कांबळी अध्यक्षपदी तर नागपूरचे नरेश गडेकर (उपाध्यक्ष - उपक्रम) यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे़ अकोला येथील अशोक ढेरे यांची सहकार्यवाहपदी आणि नागपूरचे शेखर बेंद्रे यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे़ईश्वराने मला साथ दिलीविजयाप्रति आम्ही १०० टक्के आश्वस्त होतो. निकालही आमच्याच बाजूने लागला. मात्र, उपाध्यक्ष (उपक्रम) पदासाठी भाऊसाहेब भोईर व मला सारखी म्हणजे ३०-३० मते पडली. दोघांनाही समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला आणि यात ईश्वराने मला साथ दिली.- नरेश गडेकर, उपाध्यक्ष (उपक्रम) - अ़भा़ मराठी नाट्य परिषद
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर वैदर्भीयांचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:24 AM
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या प्रमुख कार्यकारिणीत वैदर्भीय नाट्यकर्मींनी घवघवीत यश मिळवले आहे.
ठळक मुद्देचार जागांवर वर्णी : नरेश गडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड