शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

‘एमएचटी-सीईटी’मध्ये वेदांत साबू ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:22 PM

औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेदांत साबू याने ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त करत अव्वल क्रमांक मिळविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषधविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. महाविद्यालये व विविध कोचिंग क्लासेसकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेदांत साबू याने ९९.९९ पर्सेंटाईल प्राप्त करत अव्वल क्रमांक मिळविला आहे.राज्यभरातील वैद्यकीय, अभियांत्रिकी व औषधविज्ञानशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे २ मे ते १३ मे या कालावधीदरम्यान घेण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातून २५ हजारांहून अधिक परीक्षार्थी बसले होते. नागपुरातून यशोदा ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी राहुल पाठक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव वासनिक यांनी ९९.९५ पर्सेंटाईलसह द्वितीय तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सलोनी सिंह हिने ९९.९४ पर्सेंटाईलसह तृतीय स्थान पटकाविले.याशिवाय सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी शुभम कलंत्री याला ९९.९१ पर्सेंटाईल मिळाले, तर वेदांश सांघी याला ‘पीसीबी’ गटातून ९९.८९ पर्सेंटाईल प्राप्त झाले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुस्कान त्रिवेदी हिला ९९.८८ पर्सेंटाईल मिळाले. याशिवाय अनंत सोहळे (९९.८८), अथर्व कठाळे (९९.८३), कल्याणी सैनिस (९९.८५) यांनीदेखील यश संपादित केले.‘सर्व्हर डाऊन’चा फटकामंगळवारी दुपारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, ‘सर्व्हर डाऊन’ असल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागला. कित्येक विद्यार्थ्यांना सायंकाळी ७ वाजेपर्यंतच आपला निकालच पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी शिक्षण विभागाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.९९ हून अधिक ‘पर्सेंटाईल’ मिळालेले विद्यार्थीवेदांत साबू ९९.९९राहुल पाठक ९९.९५गौरव वासनिक ९९.९५सलोनी सिंह ९९.९४शुभम कलंत्री ९९.९१साहिल गिºहेपुंजे ९९.९०वेदांश सांघी ९९.८९मुस्कान त्रिवेदी ९९.८८अनंत सोहळे ९९.८८सुभाष चांडक ९९.८६अथर्व कठाळे ९९.८३कल्याणी सैनिस ९९.८५ईशान प्रयागी ९९.८१शुभम काळे ९९.८०प्रथमेश गणोरकर ९९.७३कैवल्य पितळे ९९.७०चिराग कसाट ९९.७०अभिषेक सिंह ९९.७०हरीश बडवाईक ९९.६९पीयूष पिसे ९९.६३अश्विन बापट ९९.६३आदित्य तिडके ९९.६२नीलेश पलांदुरकर ९९.५३प्रथमेश मेहरे ९९.२०मिहीर चौधरी ९९.२०

टॅग्स :examपरीक्षाnagpurनागपूर