नागपूर : येथील बाजारपेठेत सोमवारी भाजीपाला मुबलक आला, मात्र दर पडले. गेल्या आठवडाभरापासून ही स्थिती असूनही शेतकऱ्यांना नाईलाजाने माल आणावा लागत आहे. परंतु मंगळवारनंतर बाजारातील भाजीची आवक कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनचा पहिला दिवस असूनही सोमवारी बाजारात माल मोठ्या प्रमाणावर आला. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीला लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. शेतकऱ्यांना याची कल्पना नसल्याने बाजारात आलेल्या मालावर कसलाही परिणाम जाणवला नाही. उलट भीतीपोटी अधिक माल आला. दर मात्र मोठ्या प्रमाणावर पडलेले होते. तरीही नाईलाजाने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने माल विकावा लागला.
मागील आठवड्यापासून दर पडलेले आहेत. त्यात अद्यापही चढ झालेली नाही. २० ते २५ रुपये प्रति किलोने जाणारा माल ५ ते १० रुपये किलो भावाने सोमवारी ठोक बाजारात विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
...
असे होते ठोक दर (प्रति किलो)
पालक : २ ते ५ रु.
मेथी : ८ ते १२ रु.
मुळा : ७ ते १० रु.
कोथिंबीर : ६ ते १० रु.
फुलकोबी : ७ ते १० रु.
पानकोबी : ५ ते ७ रु.
...
कोट
अफवांमुळे शेतकरी धास्तावलेला होता. मालाची अधिकाधिक तोड करून तो बाजारात आणला गेला. त्यामुळे आज आवक अधिक वाढलेली दिसत आहे. परंतु दर घटल्याने आणि भाजीबाजार नियमित सुरू राहणार असल्याने उद्या ही आवक घटण्याची शक्यता अधिक आहे.
- राम महाजन, सचिव, महात्मा फुले भाजीबाजार अडतिया असोसिएशन