शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:10 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटरची साेय करण्यात आली हाेती. मध्यंतरी या रुग्णालयातील तज्ज्ञ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटरची साेय करण्यात आली हाेती. मध्यंतरी या रुग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांची इतरत्र बदली करण्यात आल्याने तसेच त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात न आल्याने ते पाचही व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत. काेराेना संक्रमण काळात रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असल्याने तसेच रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत असल्याने हा प्रकार उघड झाला.

रामटेक शहरात उपजिल्हा रुग्णालय, नगर पालिकेचे सूतिकागृह व याेगीराज हाॅस्पिटलमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या तिन्ही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत असून, व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. या मूलभूत साेयी उपलब्ध झाल्यास रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज काेविड केअर सेंटर हाेऊ शकते. या उपजिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी पाच व्हेंटिलेटर आणले हाेते.

डॉ. जफर अब्बास असगर अली यांना हे व्हेंटिलेटर ऑपरेट करण्याचा अनुभव हाेता. ते तालुक्यातील एकमेव भूलतज्ज्ञ हाेते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये डॉ. जफर अब्बास असगर अली यांना ८ मार्च २०२१ राेजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात न आल्याने तसेच इतर डाॅक्टरांना व्हेंटिलेटर ऑपरेट करता येत नसल्याने ते धूळखात पडले आहेत.

ही बाब लक्षात येताच काॅंग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन ही समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. या मागणीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पातूरकर यांनी आ. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २१) उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत व्हेंटिलेटरची पाहणी केली. यावर पुढे काय कारवाई केली जाईल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

....

कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, जनरल फिजिशियन, बालराेगतज्ज्ञ, डाेळ्यांचे डॉक्टर या महत्त्वाच्या तज्ज्ञ डाॅक्टरांसह मुख्य परिसेविका, सहायक परिसेविका, दाेन फार्मासिस्ट, दाेन लॅब टेक्निशियन, एक एक्सरे टेक्निशियन, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, लिपिक अशी महत्त्वाची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील आराेग्य सेवा रुळावर आणण्यासाठी ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने का हाेईना तातडीने भरणे गरजेचे आहे.