शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम संपले

By admin | Published: March 12, 2016 3:18 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीच्या कामाची गाडी अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे.

नागपूर विद्यापीठ : आता आव्हान ‘सेवार्थ’ च्या तांत्रिक प्रक्रियेचेनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रलंबित ‘सेवार्थ’ प्रणालीच्या कामाची गाडी अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. ११ दिवसांच्या कालावधीत नागपूर विद्यापीठ व उच्चशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण केले. पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता पदांच्या पडताळणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. ‘सेवार्थ’चे काम अनेक दिवसांपासून अडकले असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर विद्यापीठातील ९९७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन सामान्य निधीतूनच होत आहे. राज्यातील विद्यापीठांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार सेवार्थ प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार उच्च शिक्षण सहसंचालकांनी मागवलेली कर्मचारी व अधिकाऱ्यांची माहिती कागदपत्रांसह विद्यापीठाने कळविणे अपेक्षित होते. यात अगदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासूनच्या सखोल माहितीचा समावेश होता. परंतु ही माहिती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तिकांची तपासणी पूर्ण झालीच नव्हती. कर्मचारी संख्या मोठी असल्यामुळे संबंधित काम पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.विद्यापीठाचे ‘सेवार्थ’चे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अंजली रहाटगावकर व कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी चर्चा केली. संबंधित माहिती भरणे व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे यासाठी विद्यापीठातील कर्मचारी तसेच उच्चशिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे काम करतील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर ११ दिवसांच्या कालावधीत सेवापुस्तिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण करण्यात आले. विद्यापीठात तसेच सहसंचालक कार्यालयातील सुमारे ३० कर्मचारी-अधिकारी यांनी सातत्याने हे काम केले. (प्रतिनिधी)