लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माहेरून रक्कम आणून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला एका आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एमआयडीसीच्या राय टाऊन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निर्मल रणजी चॅटर्जी (वय ३६) या आरोपीविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.हिंगणा मार्गावरील राय टाऊनमध्ये राहणाऱ्या मालविका निर्मल चॅटर्जी (वय ३१) यांनी १३ फेब्रुवारीला सकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. मूळचे रायपूर छत्तीसगड येथील रहिवासी असलेल्या मालविका आणि निर्मलचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. निर्मल येथील हिंगणा एमआयडीसीत कंपनीत कामाला होता. त्यामुळे हे दोघे भाड्याच्या सदनिकेत राहत होते. मुलबाळ झाले नसल्याने त्यांच्यात खटके उडायचे. त्यात मालविकाने माहेरून पैसे आणावे म्हणून निर्मल तिला त्रास देत होता. तर, माहेरून पैसे आणण्यास मालविका नकार देत होती. त्यामुळे तिच्या त्रासात भर पडत होती. त्याला कंटाळून अखेर मालविकाने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा पती निर्मल हाच जबाबदार असल्याची तक्रार मालविकाची बहीण तृप्ती प्रकाश भट्टाचार्य (वय ३६, रा. वैकूंठपूर, छत्तीसगड) यांनी एमआयडीसी पोलिसांकडे नोंदवली. त्यावरून सोमवारी रात्री पोलिसांनी आरोपी निर्मलविरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात हुंड्यासाठी घेतला पत्नीचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:44 PM
माहेरून रक्कम आणून देण्यास नकार देणाऱ्या पत्नीला एका आरोपीने शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. एमआयडीसीच्या राय टाऊन परिसरात ही घटना घडली.
ठळक मुद्देतीन वर्षांपूर्वी झाले होते लग्न : पतीविरुद्ध गुन्हा दाखल