शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

विदर्भात ६६.२३ टक्के कोरोनारुग्ण बरे; ५३२ रुग्ण व १६ मृत्यूची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 10:58 PM

देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या १६१६१, मृतांची संख्या ४२०

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रविवारी ५३२ नव्या रुग्णांची व १६ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १६१६१ झाली असून मृतांची संख्या ४२०वर पोहचली आहे. १०७०५ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४८१९ रुग्ण उपचाराखाली आहेत. देशात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रमाण ६४.५३ टक्के आहे. त्या तुलनेत विदर्भात त्यापेक्षा जास्त ६६.२३ टक्के आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण देशात २.१५ टक्के असताना विदर्भात किंचित जास्त २.५९ टक्के आहे. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे.

गेल्या पाच दिवसापासून रोज ५०० वर रुग्णांची नोंद होत आहे. विशेषत: नागपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा २३५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५८९७ वर पोहचली आहे. महत्त्वाचे म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद मंगळवारी झाली. १५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १५४ वर गेली आहे. ३६१५ रुग्ण बरे तर १९६७ रुग्ण उपचार घेत आहेत. नागपूरसोबतच अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा विळखा घट्ट होऊ घातला आहे. या जिल्ह्यात ६६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या २२९४ तर मृत्यूची संख्या ६१ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ३९६ झाली आहे. जिल्ह्यात तीन मृत्यूची नोंद आहे.

बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण्संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ५१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या १३९९ झाली आहे. ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ३४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णसंख्या ६५४ झाली आहे. १६ मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची ११४५ झाली असून ३३ मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. बाधितांची संख्या ५७० झाली आहे. जिल्ह्यात मात्र एकच मृत्यू आहे. भंडारा जिल्ह्यात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या २७१ वर पोहचली आहे. दोन मृत्यूची नोंद आहे.

अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा मंदावली. १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मात्र मृत्यूसत्र सुरूच आहे. एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या ११० वर पोहचली आहे. वर्धा जिल्ह्यात सात रुग्णांना बाधा झाल्याने रुग्णसंख्या २४९ झाली आहे, नऊ मृत्यूची नोंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. रुग्णसंख्या ६०७ तर मृत्यूची संख्या एकवर स्थिरावली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस