आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.केंद्रात सत्ता आल्यास विदर्भाचे स्वतंत्र राज्य होईल, असे आश्वासन भाजपा नेत्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. गेल्या साडेतीन वर्षापासून केंद्रात सत्ता असूनही विदर्भाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपा नेत्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसरीकडे राज्य सरकारवर तब्बल ४.५० लाख कोटींचे कर्ज आहे. राज्याची आर्थिक स्थिती विचारात घेता संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. नव्याने निर्माण झालेले उत्तराखंड राज्य प्रगतीच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे. याचा विचार करता स्वतंत्र राज्य झाल्यास विदर्भाचा विकास होईल. आजवर विदर्भासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी वळविण्यात आला. यामुळे विदर्भ मागास राहिला. परिणामी विदर्भ शेतकरी आत्महत्यात सर्वात पुढे असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा, धान अशी नगदीची पिके होतात. परंतु प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. धान उत्पादक जिल्ह्यांना पेरणीच्यावेळी पाणी मिळत नसल्याने पूर्व विदर्भातील या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. विदर्भात उद्योगात गुंतवणूक नसल्याने बेरोजगार युवकांना रोजगार नाही. युवकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते, अशी गंभीर परिस्थिती आहे. विदर्भ राज्याबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील ६२ विधानसभा मतदार क्षेत्रातील जनतेशी संवाद साधणार आहे. जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांना आत्मबळ देऊ न आत्महत्या व बेरोजगारांचे स्थलांतर थांबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.१ फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा समावेश असावा, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.म्हणून जशास तसे उत्तर !भाजपाची छोट्या राज्याची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला तर स्वतंत्र विदर्भाची घोषणा होऊ शकते. विदर्भ राज्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. परंतु यावर कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मला अधिवेशन कालावधीत २० डिसेंबरला नोटीस मिळाली होती. यावर ३० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावयाचे होते. परंतु मला माझ्या पत्राचे उत्तर न मिळाल्याने मीही नोटीसला उत्तर दिले नाही, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी यावेळी मांडली.
स्वतंत्र राज्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 10:35 PM
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी , उद्योगांचा अभाव, वीज भारनियमन,कुपोषण व नक्षलवाद अशा समस्या मार्गी लागव्यात, तसेच विदर्भाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढणार असल्याचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देआशिष देशमुख जनतेशी संवाद साधणारभाजप नेत्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर